शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी जीवनाचा राजमार्ग ‘योगा’: अंजली पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 13:30 IST

आनंदी जीवनाचा राज मार्ग योगा आहे. यामुळे माझ्यासह प्रत्येक व्हॉलीबॉल खेळाडूला फायदा झाला आहे. योगामुळेच आपण व्हॉलीबाल स्पर्धेत छत्रपती शिवाजी पुरस्कारापर्यंत पोहचू शकलो, अशी माहिती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉल खेळाडू तथा रेल्वेच्या कार्यालय अधीक्षक अंजली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देनिरामय आयुष्यासाठी योग आचरणात आणाव्हॉलीबॉलसाठी योगाचा मोठा फायदाविविध आसने ठरतात वरदानयोगाद्वारेच आवश्यक तणावमुक्ती व लवचिकता

जळगाव : आनंदी जीवनाचा राज मार्ग योगा आहे. यामुळे माझ्यासह प्रत्येक व्हॉलीबॉल खेळाडूला फायदा झाला आहे. योगामुळेच आपण व्हॉलीबाल स्पर्धेत छत्रपती शिवाजी पुरस्कारापर्यंत पोहचू शकलो, अशी माहिती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉल खेळाडू तथा रेल्वेच्या कार्यालय अधीक्षक अंजली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वयाच्या ११ व्या वर्षापासून योग साधना करणाऱ्या अंजली पाटील यांच्याशी योगदिनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला असता त्यांनी सर्वप्रथम आवाहन केले की, अख्या जगानेही स्वीकारलेल्या या विद्येचा आपल्या देशातही अधिकाधिक प्रचार, प्रसार झाला पाहिजे. सर्वांनी निरामय आरोग्यासाठी योगाचा स्वीकार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी योग दिनानिमित्त केले.अंजली पाटील यांनी सांगितले की, मी लहानपणापासून व्हॉलीबॉल खेळत असल्याने त्या सोबतच मला योगाचेही धडे दिले गेले. योगाचा प्रसार आज वाढत आहे, ही आनंदाची बाब असून मला शालेय जीवनापासूनच हे धडे मिळाले व सलग ३५ वर्षांपासून मी नियमित योगा करीत आहे. याचा फायदा होऊन मी रेल्वेच्या व्हॉलीबॉल संघाची प्रशिक्षक म्हणून सध्या काम करीत असून आमच्या प्रत्येक खेळाडूलादेखील आम्ही योगाचे धडे देत असते.योगाद्वारे करण्यात येणाºया विविध आसनांमुळेच पाठदुखी, गुडघ्यांचा त्रास होत नाही. त्यामुळे व्हॉलीबॉलमध्ये यशाचे शिखर गाठता आले, असे अंजली पाटील यांनी सांगत सर्वांनी याचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.व्हॉलीबॉलसाठी शरीराला लवचिकता, तणावमुक्ती आवश्यक असून ती योगाद्वारेच मिळते. सोबतच खेळत असताना कोणतीही इजा होऊ नये म्हणून योगाचा आम्ही पुरेपूर उपयोग करीत असतो. खेळताना उंच उडी घेताना इजा होण्याची व पाठीचा त्रास (बॅकपेन) होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठीच योगाद्वारे शरीर लवचित ठेवण्यास मदत होते व शरीरास इजा होत नाही असे अंजली पाटील यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :YogaयोगJalgaonजळगाव