शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरण : तरसोद-फागणे टप्प्याच्या कामास पुढील आठवड्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:37 IST

शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेची अधिकाऱ्यांनी नितीन गडकरींना दिली माहिती

जळगाव : महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे ठप्प झालेले काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या (नही) अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरापर्यंतच्या चौपदरीकरणाची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाणून घेतली. यात या कामाची ई-निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती ‘नही’च्या अधिकाºयांनी गडकरी यांना दिली.महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मक्तेदार त्याच्या हिश्शाचा ६० टक्के उभारू न शकल्याने गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हालचालींना वेग आला व हे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.जिल्ह्यातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे अनेक महिन्यांपासून आहे. सुरूवातीला काही वर्ष तर निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने वाया गेले. तर नंतर एल अ‍ॅण्ड टी सारख्या कंपनीने मक्ता घेऊन नंतर काम सोडून दिले. अखेर जिल्ह्यातील कामाचे दोन टप्पे करून निविदा देण्यात आल्या. तरीदेखील मक्तेदार त्याच्या हिश्शाचा ६० टक्के उभारू न शकल्याने गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले आहे. मात्र आता तरी हे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहरातील आठ कि.मी.च्या रस्त्याची घेतली माहितीबुधवारी दिल्ली येथे नितीन गडकरी यांनी राज्यातील रखडलेल्या रस्त्यांची माहिती जाणून घेतली. त्यात जळगाव शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता नगरापर्यंतच्या ८ किमी चौपदरीकरणाचीही विचारणा केली. त्यात नहीच्या अधिकाºयांनी या कामाची सुमारे ७० कोटींची ई-निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती गडकरी यांना दिली.दरम्यान, ३० जानेवारी २०१९पर्यंत या कामासाठी निविदा भरण्याची मुदत आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर आठवडाभरात किती निविदा दाखल झाल्या या बाबत मात्र आकडेवारी मिळू शकली नाही.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव