शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षामध्ये चार तालुक्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:05 IST

मुलांचे सामूहिक विवाह करणार : पारोळा, अमळनेर, जामनेर व चाळीसगावचा समावेश

जळगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना घडत असून, गेल्या दोन वर्षांत झालेल्या आत्महत्येच्या घटनांमध्ये ७० टक्के आत्महत्या या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. तर यामध्ये सर्वाधिक आत्महत्येच्या घटना या पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा या भागात झाल्या आहेत. अशी माहिती हॅप्पी मिरर रिसर्च अ‍ॅण्ड मल्टीपर्पज फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. आशिष जाधव यांनी बुधवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, प्रा. डी. डी. बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, ईश्वर मोरे, अशपाक पिंजारी उपस्थित होते. माहितीच्या अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयातून आत्महत्याग्रस्त शेतकºयांची माहिती व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील आत्महत्या झालेल्या व्यक्तींची माहिती घेतली होती. यामध्ये २०१५ ते २०१७ या दोन वर्षांत झालेल्या आत्महत्यांचे संख्या शास्त्रीय विश्लेषण केले असता, आत्महत्या केलेल्यांमध्ये ९५ टक्के पुुरुष हे शेतकरी असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली. सन २०१२ ते २०१७ दरम्यान झालेल्या आत्महत्यांमध्ये १५ ते ३३ वयोगटातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्याच्या कारणांमागे कर्जबाजारीपणा व दारुच्या व्यसन आहे. तसेच एस. सी., एस. टी व मुस्लीम समाजामध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी असल्याचेही ते म्हणाले.शेतकºयांच्या मुला-मुलींसाठी मेट्रोमेनियम वेबसाईट सुुरु करणारआत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या मुला-मुलींसाठी यासाठी निशुल्क मेट्रोमेनियम वेबसाईट सुरु करण्यात येणार आहे. यातून निशुल्क सामुहिक विवाह सोहळा करण्यात येणार आहे. तसेच आत्महत्येच्या घटनांना आळा बसण्यासाठी पारोळा, अमळनेर, चाळीसगाव या ठिकाणी शोध, बोध व उपाय या विषयाला धरुन एक दिवसीय कार्यशाळादेखील घेणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव