शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सुरेशदादा जैन चालवताय वडील भिकमचंद जैन यांचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:29 IST

-विकास पाटील सुरेशदादा यांच्या बालपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते. राजकारणाच्या माध्यमातून वडिल स्व.भिकमचंद जैन हे जनसेवा करीत होते. जळगावकरांच्या ...

-विकास पाटीलसुरेशदादा यांच्या बालपणापासूनच घरात राजकीय वातावरण होते. राजकारणाच्या माध्यमातून वडिल स्व.भिकमचंद जैन हे जनसेवा करीत होते. जळगावकरांच्या प्रेमापोटी ३० वर्षे ते नगराध्यक्ष होते. लहानपणापासून वडिलांचे कार्य मी अनुभवत होतो. मात्र माझी राजकारणात येण्याची सुरुवातीला इच्छा नव्हती. त्याऐवजी व्यवसाय करावा अशी इच्छा होती. खान्देश मील त्यावेळी सुरु होती. मात्र कुटुंबातील एका सदस्याने राजकारणात आले पाहिजे, असा विचारपुढे आला. मी राजकारणात यावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. त्यानुसार पुढे राजकारणात आलो व त्यामाध्यमातून सेवेचे अखंड कार्य आजही सुरु आहे, सुरेशदादा जैन सांगत होते.१९७७ मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक मी लढवावी, अशी इच्छा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांनी व्यक्त केली. मात्र त्यावेळी ईश्वरलाल जैन यांना उमेदवारी देण्याचे एकमताने आम्ही ठरविले व ते काँग्रेसतर्फे निवडून आले. त्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने ही जागा रिक्त झाली. १९८० मध्ये पुन्हा निवडणूक लागली.१९८० पर्यंत मी पूर्णवेळ व्यवसायात होतो. १९८० ला विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व राजकारणात आलो. व्यवसायाची धुरा भाऊ रमेशदादा जैन यांच्याकडे सोपविली. १९८० ला आमदार म्हणून निवडून आलो. सुरुवातीला फक्त १५ वर्षे राजकारण करण्याचे ठरविले होते. मात्र प्रत्येक पाच वर्षानंतर झालेल्या निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला, मतदारांचे प्रेम मिळत गेले व मी जनसेवा सुरु ठेवली. आज ४० वर्षे झाली. जनतेचे प्रेम कायम आहे. ९ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला. त्यात जनतेसह कुटुंबीयांचीही समर्थपणे साथ मिळाली. त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. जोपर्यंत आरोग्याची साथ मला मिळेल तोपर्यंत जनसेवेचा हा अखंड यज्ञ सुरुच राहिल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही.पत्नी रत्ना, मुलगा राजेश, शैलेंद्र व मुलगी मिनाक्षी यांची आयुष्याच्या प्रत्येकवडिल स्व.भिकमचंद जैन हे ३० वर्षे जळगावचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या इच्छेनुसार मी राजकारणात आलो. सुरुवातीला फक्त १५ वर्षे राजकारण करण्याचे ठरविले मात्र जनतेच्या प्रेमापोटी ४० वर्षांपासून राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहे. वडिलांचा हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.टप्प्यावर साथ मिळाली व आजही ती मिळत आहे. राजेश, शैलेंद्र हे व्यवसाय सांभाळत असून मिनाक्षी या एसडी-सीडच्या माध्यमातून कार्य करीत असून मी आनंदी व समाधानी आहे.माझ्या आयुष्यात ‘लोकमत’चा वाटा मोठा आहे. एक निर्भिड, निस्पृह वृत्तपत्र म्हणून ‘लोकमत’ची ओळख आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, अडीअडचणी, व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत असतो. ‘लोकमत’ची अशीच भरभराट होवो, या शुभेच्छा.-सुरेशदादा जैन, माजी मंत्री.

टॅग्स :Jalgaonजळगाव