शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...इथे ओशाळली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:36 IST

दोन तास मृतदेह जागेवरच : चिखलात आढळला रेल्वे कर्मचाऱ्याचा मृतदेह

जळगाव : कोरोनामुळे अनेक ठिकाणी माणुसकीच हरवल्याची उदाहरणे पहायला मिळतात. मात्र याचा प्रत्यय जळगावकरांनी रविवारी घेतला. एक मृतदेह चिखलात दोन तास जागेवरच पडून होता. मात्र त्याला कोरोना असेल, या भीतीने कुणीही त्याच्याजवळ फिरकले नाही. अखेर दोन तासांनी पोलिसांनीच त्याला उचलले. शिवाजीनगर हुडको परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. हरीष तुळशीराम सोनवणे (४५, रा.शिवाजीनगर हुडको) असे या मृताचे नाव आहे. हरीष हे रेल्वेत गँगमन म्हणून नोकरीला होते.पालिकेच्या कृपेने साचलेल्या चिखलातच हा मृतदेह आढळून आल्याने चिखलामुळे पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज शिवाजीनगरमधील रहिवाशांनी केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालात हृदयविकराचा झटका आल्याचे निदान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे हे रेल्वेत गँगमन म्हणून नोकरीस होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता त्यांचा मृतदेह परिसरातील रस्त्यावर चिखलात आढळून आल्याने खळबळ उडाली.-कोरोनाच्या भीतीने दोन तास मृतदेहाजवळ कोणी गेलेच नाही. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटना कळविली व हा मृतदेह रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला होता.- वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी शवविच्छेदन केले. सोनवणे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निदान या अहवालातून आले आहे.- या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार संजय झाल्टे व पोलिस नाईक दिलीप पाटील तपास करीत आहेत. मृत सोनवणे यांच्या पश्चात आई कुसुमबाई, पत्नी टीना, मुलगा राहुल व मुलगी पूनम असा परिवार आहे.मृतदेहाशेजारी बूट कसे?दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार, सोनवणे यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला आहे. मात्र जर हृदयविकाराने मृत्यू झाला असेल तर मग त्याचे बूट त्याच्या पायात असण्याऐवजी मृतदेहाशेजारी कसे आले? वा नागरिकांच्या मताप्रमाणे जरी हा मृत्यू चिखलात पडल्यामुळे झाला असला तरीही या बुटांचा प्रश्न उरतोच! दरम्यान, हा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा, असा कयास काढून नागरिकांनी या मृतदेहाला हात लावणे तर सोडच, परंतु त्या मृतदेहाशेजारी जाणेही टाळले. त्यामुळेच हा मृतदेह निदर्शनास आल्यानंतरही दोन तास जागेवरच पडून होता. आता पालिकेच्या कृपेने चिखलात पडलेला हा मृतदेह त्यानंतर नागरिकांच्या बेर्पवाईमुळे दोन तास तसाच पडून होता. पोलिसांवर हा मृतदेह उचलून नेण्याची वेळ आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव