शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावच्या शहिदांच्या कुटुंबियांना जळगावातून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:13 IST

जळगाव : जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहिद झालेले कोपरगाव येथील रहिवासी नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या ...

जळगाव : जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहिद झालेले कोपरगाव येथील रहिवासी नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या कुुटुंबीयांना जळगावातून आर्या फाउंडेशनतर्फे ६५ हजार रुपयांची मदत करीत आधार देण्यात आला.देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फाउंडेशन ही संस्था पुढे सरसावली असून शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करीत आहे. फाउंडेशनतर्फे आतापर्यंत राज्यातील ठिकठिकाणच्या १५ शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.यात आता कोपरगावातील शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत कोपरगावचे नायब सुभेदार सुनील वलटे हे शहीद झालेत. फाउंडेशनतर्फे वीरपत्नी मंगल वलटे यांच्या नावे ६५ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या घरी जाऊन फाउंडेशनचे प्रतिनिधी रवींद्र पाटील, रोशन शाह यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सुपुर्त केला. या वेळी कोपरगावचे अजय बाबुराव पहेलवान, शहीद नायब सुनील वलटे यांचे वडील रावसाहेब वलटे, आई सुशीला वलटे, पत्नी मंगल वलटे उपस्थित होते. फाउंजेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी शहिदांच्या कुटुंबियांशी संपर्क साधत सांत्वन केले.सरपंच मदतीसाठी पुढेशहीद वलटे यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी पक्के घर नसल्याचे लक्षात आल्यावर डॉ. पाटील यांनी दहेगाव बोलका येथील सरपंच साधना देशमुख यांना मदत करण्याची विनंती केली. त्यावर पक्क्या घरासाठी मदत करू असे आश्वासन सरपंचांनी दिले.स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपऱ्यात मदतीसाठी पोहचतात पदाधिकारीराज्यात आतापर्यंत नाशिक, अमरावती, यवतमाळ, अकोला, सातारा, सांगली, नंदुरबार, शिंदखेडा, मुंबई, धुळे पुणे, मलकापूर, बुलढाणा इत्यादी ठिकाणच्या शहीद कुटुंबियांच्या घरी आर्या फाउंडेशनचे पदाधिकारी हे स्वखर्चाने मदतीसाठी पोहचतात, हे विशेष.देशासाठी प्राणाचे बलिदान देणाºया शहिद जवानांच्या कुटुंबियांना आधार मिळावा व सीमेवरील जवानांचा हुरूप वाढावा या उद्देशाने आपण ही मदत करीत असतो, असे आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले.या शहीद जवानांच्या कुटुंबियांना केली मदतसंदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, ता.जि. नाशिक), विकास कुळमेथ े(नेरळ, ता.वणी, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर, ता.जि. अमरावती), चंद्रकांत गलांडे (जाशी, ता.माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव, ता.मिरज, जि. सांगली), सुमेध वामन गवई (लोणाग्रा,ता.जि.अकोला), रवीद्र धनावडे (मोहट मेळा, ता.जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार, (नंदुरबार, रा.म्हसरूळ, नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाने, ता.शिंदखेडा, जि. धुळे), कौस्तुभ प्रकाश राणे (मिरा रोड मुंबई), केशव गोसावी (सिन्नर, नाशिक), मेजर शशीधरन नायर, (खडकवासला, पुणे) संजय राजपूत (मलकापूर), नितीन राठोड (चोरपांगरा, लोणार,जि. बुलढाणा) 

टॅग्स :Jalgaonजळगाव