शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेच्या साहेबांनी बोलाविल्याचे सांगून चोरट्याने जळगावात २० लाखाची बॅग लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:07 IST

स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेले २० लाख रुपये कारमध्ये ठेवत असताना मागून आलेल्या एका चोरट्याने साहेब, तुम्हाला बॅँकेच्या साहेबांनी  बोलावले असे सांगून ही रक्कम लांबविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १.४५ ते २ या वेळेत स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेजवळ घडली.

ठळक मुद्देस्टेट बॅँकेजवळील घटना   कारमध्ये बॅग ठेवताना घडला प्रकार दुस-या चोरट्याने जमिनीवर पैसे टाकून चालकाचे लक्ष केले विचलीत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि १७, : स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेले २० लाख रुपये कारमध्ये ठेवत असताना मागून आलेल्या एका चोरट्याने साहेब, तुम्हाला बॅँकेच्या साहेबांनी  बोलावले असे सांगून ही रक्कम लांबविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १.४५ ते २ या वेळेत स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेजवळ घडली. यावेळीच दुसºया चोरट्याने कार चालकाच्या दिशेने १० रुपयांच्या १४ नोटा जमिनीवर टाकून तुमचे पैसे पडले म्हणत चालकाचे लक्ष विचलित केले. अवघ्या दहा मिनिटात चोरट्यांनी कार मालक व चालक यांची दिशाभूल करुन ही रक्कम लांबविल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली.

सत्रासेन आश्रमशाळेसाठी पैसे काढले बँकेतूनयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,धनाजी नाना चौधरी आदिवासी मंडळ संचलित सत्रासेन आश्रमशाळेच्या (ता.चोपडा) कामासाठी पैसे लागणार असल्याने संस्थेचे संचालक रवींद्र रायसिंग भादले (वय ३६ रा.सत्रासेन, ता.चोपडा, ह.मु.मधुबन अपार्टमेंट, पिंप्राळा रोड, जळगाव) व त्यांचा चालक गणेश रामदास कोळी (वय ३५ रा.खामखेडा, ता.शिरपूर) असे दोघं जण मंगळवारी दहा वाजता कारने (क्र.एम.एच.१९ ए.पी.६८७०) जळगाव यायला निघाले. दुपारी एक वाजता स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेत आले. शाखेच्या बाहेरच रस्त्याने कार लावल्यानंतर रवींद्र भादले यांनी कारमधील वातानुकूलीत यंत्रणा (ए.सी.)सुरु ठेवण्यासाठी चालकाला कार बंद न करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे चालकाने कार सुरुच ठेवली होती व तो कारमध्येच बसला. 

कारचा दरवाजा ‘लॉक’ न करणे पडले महागातदुपारी १.४५ वाजता रवींद्र भादले हे बँकेतून दोन बॅगांमध्ये २० लाख रुपये घेऊन आले. कारच्या मागील बाजूस सीटच्या खाली त्यांनी दोन्ही बॅगा ठेवल्या. तितक्यात एक जण मागून आला व भादले यांना साहेब, तुम्हाला बॅँकेच्या साहेबांनी लवकर बोलावले असे सांगून या बॅगा लांबविल्या. 

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा