शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९ हजार बांधकाम कामगारांना मदत, नोंदणीत मात्र अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:48 IST

दोन टप्प्यात पाच हजार लाभ : लॉकडाऊन काळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत

जळगाव : लॉकडाऊन काळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत व्हावी म्हणून शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या दोन टप्प्यांतील पाच हजार रुपयांचा जिल्ह्यातील नऊ हजार कामगारांना लाभ मिळाला आहे. उर्वरित कामगारांना नोंदणीत अडचणी येत असल्याने लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आणि सर्वच व्यवहार ठप्प झाले. या काळात लॉकडाऊन करण्यात आल्याने विविध कंपन्या असो अथवा लहान मोठ्या कामांवरील कामगार, मजूर यांना मोठा फटका बसला. यात अनेक परप्रांतीय कामगार तर येथून स्थलांतरित झाले. मात्र जे कामगार येथेच थांबून होते. त्यांना बांधकाम व्यावसायिकांनी आधार दिला. काम बंद असले तरी त्यांच्या दररोजचे जेवण व इतर प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकच सरसावले.या काळात सरकारने कामगारांना दोन टप्प्यात पाच हजारांची मदत देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यात तसे २५ हजार कामगारांची नोंद आहे. मात्र दरवर्षी सर्वच जण नूतनीकरण करीत नसल्याने १४ हजार कामगार कार्यरत असल्याचे नोंद दिसते. या पैकी ९ हजार कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.नोंदणीसाठी अडचणींचा सामना- कोणत्याही योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.- लॉकडाऊन काळातील मदतीचा लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.- मात्र बेवसाईट बंद राहत असल्याने अनेक कामगारांना नोंदच करता आली नाही.- या वर पर्याय म्हणून बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांची यादी दिली. मात्र त्यांना लाभ मिळू शकला नाही.जिल्ह्यातील बांधकाम कामगार - १४,०००लाभ मिळालेले कामगार - ९,०००लाभाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार - ५,०००काय म्हणतात कामगारया योजनेविषयी सुरुवातीला माहिती नव्हती. नंतर त्याची माहिती मिळाली त्या वेळी नोंदणीसाठी प्रयत्न केला. मात्र ऑनलाइन नोंदणीवेळी वेबसाईटवर अडचण येत असल्याने नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे योजनेचा लाभ मिळू शकला नाही.- सुरेश गवळी, कामगारऑनलाइन नोंदणीसाठी अडचणी येत असल्याने यादी पाठविल्याचे माहीत पडले. तरीदेखील योजनेचा लाभ मिळू शकला नाही. लॉकडाऊनचा काळ अत्यंत बिकट गेला. या काळात आम्ही जेथे काम करतो, त्यांची मदत मिळाल्याने आधार झाला.राजू सोनवणे, कामगार.लॉकडाऊन काळात उपासमार होणाऱ्या कामगारांना मदत व्हावी म्हणून शासनाच्यावतीने दोन टप्प्यांत पाच हजारांची मदत जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील नऊ हजार कामगारांना मदत जाहीर देण्यात आली.- सी.एन. बिरारी, सहायक कामगार आयुक्त

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव