शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जळगावात चित्तथरारक कसरतींनी चुकविला ह्रदयाचा ठोका, ‘महान गुरुमती समागम’ सोहळ्याचा नगर कीर्तनाने समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:16 IST

श्री गुरुनानक दरबार तांबापुरातर्फे आयोजन

ठळक मुद्देसुरेशदादा जैन यांनी दिल्या शुभेच्छा मुस्लीम बांधवांतर्फे स्वागत

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- महान गुरुमती समागम  सोहळ्यानिमित्त रविवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान तलवारबाजी तसेच भाले व दांडपटय़ाच्या चित्तथरारक कसरती अशा विविध शस्त्रविद्येच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या ह्रदयाचा ठोका चुकविला.   शीख समाजाचे धर्मगुरू श्री गुरुगोविंद सिंह यांची 351वी जयंती तसेच चार साहेबजादे, माता गुजर कौर आणि हिंद की चादर धनगुरू तेग बहादूर साहेब यांच्या शहिद दिवसानिमित्त दमदमी टकसाल आणि श्री गुरुनानक दरबार, तांबापुरा यांच्या संयुक्त विद्यमाने चौथा महान गुरुमती समागम सोहळा 27 व 28 जानेवारीदरम्यान मेहरूण परिसरातील विद्या इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात झाला. या सोहळ्याचा समारोप रविवारी नगर कीर्तनाने झाला. नगर कीर्तनप्रसंगी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पंजाब येथून आलेले गत्का पार्टी व धुळे येथील गुरुद्वारा साहेब रणजीत आखाडय़ातील गत्का जत्थेदार जगविंदर सिंह व त्यांच्या सहका:यांनी शस्त्रविद्येचे प्रदर्शन घडविले. 27 रोजी सायंकाळी विद्या इंग्लिश स्कूलच्या मैदानावर कीर्तन दरबार सत्संगाने या सोहळ्याला प्रारंभ झाला होता. त्यानंतर 28 रोजी सकाळी 10 वाजता पाठ साहेबांची समाप्ती झाली. त्यानंतर कीर्तन झाले. दुपारी 1 वाजता नगर कीर्तन भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या धार्मिक कार्यक्रमांसाठी संत बाबा धीरज सिंह (धुळे), रागीभाई संतोष सिंह, रागीभाई सरवन सिंह, बाबा दशटन सिंह, रागीभाई गुरप्रित सिंह उपस्थित होते. हे संपूर्ण कार्यक्रम दमदमी टकसालचे प्रमुख संत बाबा राम सिंह खालसा मिंडरावाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले.नगरकीर्तन भव्य शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेला विद्या इंग्लिश स्कूलपासून प्रारंभ झाला. 

सुरेशदादा जैन यांनी दिल्या शुभेच्छा या सोहळ्य़ास्थळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी भेट देऊन शीख बांधवांना शुभेच्छा दिला. या वेळी माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक जितेंद्र मुंदडा, विजयकुमार वाणी, नरेश खंडेलवाल हेदेखील उपस्थित होते. या वेळी सुरेशदादा जैन यांच्यासह उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. 

मुस्लीम बांधवांतर्फे स्वागतशोभायात्रा तांबापुरा परिसरात पोहचली त्या वेळी मुस्लीम बांधवांच्यावतीने संत बाबा ज्ञानी रामसिंग यांचा सत्कार करण्यात येऊन शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. सोहळ्य़ासाठी गुरुद्वारा गुरुनानक दरबार साहेब तांबापुराचे अध्यक्ष गुरुचरणसिंग, अनिलसिंह भट्टी, राजनदीप सिंग,  वीरसिंह भट्टी, हरजितसिंह बावरी, रामसिंग बावरी, मानसिंग बावरी, संतोषसिंह टाक, ईश्वरसिंह टाक, जसवंतसिंग टाक, कमलसिंग बावरी, दिलीपसिंह बावरी, सतनामसिंह बावरी, बरकतसिंह बावरी, सोनू शर्मा, वीरसिंह भट्टी, श्याम पोथीवाल, सिमरनसिंग नोट, परदीपसिंग जोहरी, सुरेंदरसिंग जोहरी, शैलेंदरसिंग जोहरी आदींनी परिश्रम घेतले.