शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

सफाईच्या ठेक्यातील मलिदा खाण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:48 IST

शिवसेना नगरसेवकांचा आरोप

ठळक मुद्देअधिकाऱ्याचा बदलीवरुन सेना-भाजपा आमने-सामने

जळगाव : शहराच्या सफाईसाठी ७५ कोटी रुपयांचा एकच ठेका काढण्यात आला आहे. याच ठेक्यातील लाभ घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांचा बदलीचा घाट घालण्यात आला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपावर केला.मंगळवारी मनपाच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची विशेष महासभा घेण्यात आली. यावेळी उपमहापौर सीमा भोळे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.या सभेत मनपा प्रशासनाकडून व आयत्या वेळचे विषय मिळून एकूण २८ विषयांना महासभेने मंजुरी दिली.मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या बदलीच्या सत्ताधाºयांकडून आलेल्या प्रस्तावावर सत्ताधारी भाजपा व विरोधक शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यासह शिवाजीनगर उड्डाणपुल बंद करुन पर्यायी रस्ता न दिल्याचा मुद्यावरुन सभेत सत्ताधारी व विरोधकांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले.मनपाच्या जमिनीवर अनधिकृत व्यवसायमनपाने भूसंपादनात घेतलेल्या काही जमिनी मनपा प्रशासनाने अद्याप देखील ताब्यात घेतल्या नसून, त्या जमीनीचा वापर मुळ मालकांकडूनच होत असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली. या जमिनी मनपाने ताब्यात घ्याव्यात अशी मागणी लढ्ढा यांनी केली. तसेच या जमिनीवर अनेक अनधिकृत व्यवसाय सुरु असल्याची माहितीही लढ्ढा यांनी दिली.कंत्राटी पध्दतीने भरले जातील कर्मचारीमनपातील अनेक जागा रिक्त आहेत. मनपाकडून पाठविण्यात आलेला आकृतीबंद शासनाकडेच पडून असल्याने मनपाकडून कंत्राटी पध्दतीने अधिकारी व कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव सत्ताधाºयांकडून महासभेत मांडण्यात आला. तसेच सर्वानुमते हा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मनपात वृक्षधिकारी, क्रिडा अधिकाºयाचीही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला.सेवानिवृत्त कर्मचाºयांची थकीत रक्कम अदा करण्याचा ठरावसत्ताधाºयांकडून मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांचे अनेक वर्षांपासून मनपाकडे थकीत रक्कम असून, ती रक्कम अदा करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला. तसेच त्यांच्या रक्कमेविषयी धोरण निश्चित करण्याची मागणी देखील सत्ताधाºयांकडून करण्यात आली. तसेच नितीन लढ्ढा यांनी मनपातील १०२ न्यायालयीन कर्मचाºयांना ‘समान काम समान वेतन’ प्रमाणे वेतन देण्याची मागणी केली. तसेच प्रज्ञाचक्षू बांधवांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं देण्याचा प्रस्ताव देखील महासभेने मंजूर केला.अभियंत्यांकडे आरोग्य विभाग खेदाची बाब - सचिन पाटीलसत्ताधारी भाजपाकडून मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या जागेवर डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला. यावेळी नगरसेवक सचिन पाटील यांनी मनपाचा आरोग्य विभाग अभियंत्यांकडे दिला असल्याने खेदाची बाब असल्याचे सांगत त्यांची बदली करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर महासभेने बहुमताने आरोग्य अधिकारी उदय पाटील यांची बदलीचा ठराव मंजूर करून घेतला.पर्यायी रस्ता नसताना उड्डाणपुलाचा निर्णय अविवेकीपणाचा शिवाजीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र, हे काम करताना मनपा प्रशासनाने आधी नागरिकांच्या सुविधेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले. हा पुल बंद करण्याआधी मनपा प्रशासनाने पर्यायी रस्ता तयार न केल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला. मनपा प्रशासनाचा हा निर्णय अविवेकीपणाचा असल्याचा आरोप देखील लढ्ढा यांनी केला. यासह भाजपाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, अ‍ॅड.दिलीप पोकळे यांनी देखील मनपा प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी दर्शवली. तसेच पर्यायी रस्त्याची व्यवस्था लवकर करण्याची मागणी केली.