कासोदा : प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने उमरे ता. एरंडोल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. अध्यक्षस्थानी ईश्वर पाटील हे होते.
शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार व इतर सर्व आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिराचे आयोजन सुनील पाटील यांनी केले होते, शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास शंभरावर लोकांचे इ.सी.जी. करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी देखील शिबिराला भेट दिली, आरोग्य सेवक सचिन पाटील, भुसावळचे नगरसेवक संजू चौधरी, आरपीआय तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर, देवा महाजन भडगाव, महेश मोरे पारोळा, समाधान पाटील, उमरे शाखा अध्यक्ष योगेश पाटील, गोपाल पाटील, संदीप पाटील लोणीकर,श्रीकांत पाटील, भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील या लोकांच्या उपस्थितीत शिबिर उत्साहात झाले. शिबिरासाठी डॉ. सागर पाटील, डॉ. दीपक राजपूत, डॉ महेश.एस पवार आदी उपस्थित होते.