शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाधित झाला बरा, नातेवाईक मात्र अडकूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:11 IST

संशयितांचा जीव टांगणीला : अहवाल विलंबाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

जळगाव : एक बाधित रुग्ण बरा होऊन घरी पोहचला मात्र, त्याच्या संपर्कातील त्याच्या नातेवाईकांचे अहवालच नसल्याने ते अजूनही क्वारंटाईन सेंटरमध्येच अडकून असल्याचा प्रकार जळगावात समोर आला आहे़ यामुळे प्रलंबित अहवालांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ याबाबत वांरवार तक्रारी व अनेक गंभीर बाबी समोर येऊनही वेळेवर अहवाल मिळत नसल्याने संशयितांचा जीव टांगणीला आहे़जिल्हाभरात अहवाल प्रलंबीत राहत असल्याचा मुद्दा पुन्हा एका प्रामुख्याने समोर आला आहे़ प्रयोगशाळा सुरू होऊनही मर्यादा कमी व संशयितांची संख्या जास्त असल्याने दररोज ४०० पेक्षा अधिक संशयितांचे नमुने दररोज प्रतिक्षेत राहत असून यामुळे संसर्गाचा धोका तर आहेच, मात्र, रुग्णांचे मानसीक खच्चीकरण व त्रास याचा धोका बळावला आहे़अनेक लहान मुलांनाही ताटकळत रुग्णालयात राहावे लागत आहे़ अहवाल वेळेवर मिळावे यासाठी कोविड रुग्णालयात सुक्ष्मजीव शास्त्र विभागाची कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे़ मात्र, यातही मर्यादेत अहवाल येत आहेत़शिवाय काही दिवसांपूर्वी धुळे येथे अहवाल पाठविले जात नव्हते, मात्र, दोन दिवसांपूर्वी धुळे येथे काही अहवाल पाठविण्यात आले होते़क्वारंटाईन सेंटर फुल्लएकट्या जवळगाव शहरातून रोज किमान ८० अहवालांची तपासणी होत असताना प्राप्त अहवालांची संख्या अगदीच नगण्य आहे़ अशा स्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात असलेले क्वारंटाईन सेंटर फुल्ल झाले असून अहवाल येत नसल्याने रुग्ण अधिकच भितीत राहत असल्याचे समोर येत आहे़ यामुळे डॉक्टरांचीही अधिकच डोकेदुखी वाढली आहे़ अशा स्थितीत संपर्कातील व्यक्तिंचे तपासणी अहवाल तरी किमान लवकर यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़असेही उदाहरण... बाधित व्यक्तिला १९ रोजी तर त्यांची पत्नी, मुलगा व मित्राचे नातेवाईक असे चौघांना २१ रोजीच क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते़ आठ दिवस संबधित रुग्णाला बरे झाल्याने घरी सोडण्यात आले मात्र, त्यांच्या नातेवाईकांचा तपासणी अहवालच नसल्याने ते गुरूवारी सांयकाळपर्यंत क्वारंटाईनसेंटरमध्येच अडकून होते़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव