शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

पैशाची उधळपट्टी केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:45 IST

साडेपाच लाखाचा ऐवज हस्तगत : जामनेरच्या घरफोडीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

जळगाव : जामनेर शहरात घरफोडी केल्यानंतर त्याच पैशाची १७ दिवसानंतर जामनेरात उधळपट्टी करीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (रा.आठवडे बाजार, भुसावळ) व सय्यद मुयोद्दीन सय्यद मुकिद्दीन उर्फ पोटल्या (रा.बोदवड रोड, भुसावळ) या दोघांच्या सोमवारी दुपारी जामनेरातील गांधी चौकातून मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्यांच्याकडून २ लाख ३३ हजार रुपये रोख व ३ लाख २४ हजार रुपये किमतीचे ६९ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.

जामनेर शहरात ८ मे रोजी पहाटे तीन ते चार वाजता बळीराम जयराम माळी (७५, गिरीजा कॉलनी, जामनेर) यांच्या घरातून चोरट्यांनी ८ लाख ५० हजार रुपये रोख व दागिने असलेली लोखंडी पेटीच लांबविली होती. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा व जामनेर पोलिसांकडून केला जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विजय श्यामराव पाटील यांना जामनेरातील गांधी चौकात दोन तरुण असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आहेत व त्याची उधळपट्टी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरुन पाटील यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना दिली. रोहोम यांनी विजय पाटील यांच्या मदतीला सहायक फौजदार अशोक महाजन, सुनील दामोदरे, रवींद्र घुगे, नंदलाल पाटील व भगवान पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने खबऱ्याच्या मध्यस्थीने दोघांना गांधी चौकातच घेरले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख ३३ हजार रुपये रोख व ३ लाख २४ हजार रुपये किमतीचे ६९ ग्रॅम सोने मिळाले. पोलिसांनी हे सोने जप्त करुन दोघांना जामनेर पोलिसात आणले.

नदीपात्रात पेटी फोडून केली वाटणीया घटनेत सय्यद मुयोद्दीन सय्यद मुकिद्दीन उर्फ पोटल्या हा मुख्य सूत्रधार असून त्याने माळी यांच्या घराची रेकी केली होती. चोरीचा प्लॅन तयार केल्यानंतर आकाश उर्फ चॅम्पियन, वसीम अहमद पिंजारी (रा.भुसावळ) व जितू (रा.भुसावळ) या तिघांना बोलावले. ७ मे रोजीच्या रात्री माळी यांच्या घराच्या परिसरातच थांबून पहाटेच्या सुमारास मागच्या दरवाजाने जाऊन सोने व रोकड असलेली पेटी उचलून भुसावळ रस्त्यावरील नदीपात्रात नेली. तेथे पेटी फोडून रक्कम व दागिन्यांची वाटणी केली. उर्वरित रक्कम फरार असलेल्या दोघांकडे आहे. दरम्यान, माळी यांनी घराच्या दुरुस्तीसाठी बॅँकेत ठेवलेले ८ लाख ५० हजार रुपये काढले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांनी मागचा दरवाजा उघडा ठेवला होता. पेटी उचलत असल्याचा आवाज झाल्याने ते पेटीजवळ आले असता तेथून पेटी गायब झालेली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव