शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीच्या पैशात मौजमस्ती केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 21:40 IST

जळगाव : नेहमी गावठी व देशी दारु पिणारे महागडी व विदेशी दारुसह मांसाहारी जेवणावर ताव मारायला लागले अन् तेथेच ...

जळगाव : नेहमी गावठी व देशी दारु पिणारे महागडी व विदेशी दारुसह मांसाहारी जेवणावर ताव मारायला लागले अन् तेथेच घरफोडी करणारे दोघं जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ज्ञानेश्वर पंढरी बाविस्कर (३५) व सचिन उर्फ घाऱ्या युवराज बाविस्कर (२७) दोघं रा.शनी पेठ, जळगाव यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना सोमवारी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पुंडलिक सोनवणे (रा.कांचन नगर) हे बाहेरगावी नारायण नागबली पूजेसाठी गेले असता २० सप्टेबर २०१९ रोजी त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये रोख व दागिने असा २ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.घाºयाने दिली टीपअटक केलेल्यांमधील सचिन उर्फ घाºया हा मोहन सोनवणे यांच्या घरासमोर वास्तव्याला आहे. सोनवणे यांच्याकडे काही तरी व्यवहार झालेला आहे व त्याची रक्कम घरात असून पूर्ण कुटुंब गावाला गेल्याची टीप घाºया याने ज्ञानेश्वर बाविस्कर याला दिली. त्यानुसार दोघांनी त्याच रात्री घरफोडी करुन ही रक्कम लांबविली.ही माहिती दोघांनीच पोलीस तपासात दिली. दरम्यान, ही घरफोडी दोघांनीच केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील व यांच्या पथकाने दोघांना अटक केली.मौजस्तीच आली अंगाशीया दोघांनी घरफोडी केल्यानंतर रोख रक्कम वाटून घेत हॉटेलमध्ये उच्च दर्जाची दारु व मांसाहारीवर ताव मारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दोघांकडे दोन हजाराच्या नोटांचे बंडल असल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले होते. तेथेच संशयाची पाल चुकचुकली आणि दोघांना पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल मात्र हस्तगत झालेला नाही. शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात दोघांना देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव