शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

दांडियात चॉकलेट वाटून घरी आला अन्...; आयोध्या नगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By विजय.सैतवाल | Updated: October 21, 2023 15:17 IST

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित दांडिया कार्यक्रमात चॉकलेट वाटप केल्यानंतर घरी जाऊन विशाल तुकाराम चौधरी (२८, रा. अयोध्या नगर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अयोध्या नगरातील विशाल चौधरी हे कंपनीत कामाला होते. शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान गल्लीतील नवरात्रौत्सवाच्या दांडिया कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते घरी गेले व घरात कुणीही नसताना किचन रूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी हर्षाली या घरी आल्या त्या वेळी त्यांना पतीने गळफास घेतल्याचे दिसले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीला पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेवून तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे समजू शकले नाही.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे, आकाश परदेशी करत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, तीन वर्षाची मुलगी एैशिका असा परिवार आहे.

शेवटचे घरी सोडून द्या, शेवटचे धन्यवाद....विशालने आत्महत्या करण्यापूर्वी गरबा-दांडिया कार्यक्रमात सर्वांना चॉकलेट वाटल्या. त्यानंतर ‘मला शेवटचे घरी सोडून द्या’, असे मित्रांना सांगितले. त्यावेळी एका जणाने त्याला दुचाकीने घरी सोडले. त्यालादेखील ‘शेवटचे धन्यवाद’ असे म्हणून घरात निघून गेला. घरात गेल्यानंतर नव्या दोरीने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस