समाधान निकुंभ ।दापोरा ता. जळगाव : गिरणा काठ दुथडी भरून वाहत असला तरी दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजलेला आहे. मागील वर्षी आलेला कोरडा दुष्काळ, बोंडअळी, केळीवरील रोगाचा प्रादुर्भाव अश्या अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करताना दापोरासह परिसरातील धानोरा, मोहाडी, लमांजन, कु ºहाडदे, वाकडी येथील शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असताना या वर्षी सुरवातीलाच चांगला पाऊस असल्याने अधिक उत्पन्न मिळेल अशी आशा होती.मात्र परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकारामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्याने दापोरा सह परिसरातील शेतकरीवर्ग संकटात सापडला असल्याची भावना लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.सोयाबीन,कापूस,मका,ज्वारी सारखी पिके हातची गेलीपरिसरात सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी यासारखी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे ऐन काढणीला आलेली पिके पंधरा दिवस जरी मिळाली असती तर सर्व हंगाम आटोपला असता मात्र तोडातील घास गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे भरीव मदतीची अपेक्षा शासनाने करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.गुराचा चारा कसा उपलब्ध करावाआलेल्या अस्मानी संकटाने मुक्या प्राण्याचा देखील तोडतील घास गेल्याने चारा कसा उपलब्ध करावा हा प्रश्न पशुधनवासीयासमोर येऊन पडला आहे. सध्या असलेला चारा हा भुरशीजन्य झाल्याने गुरे दगावण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने दुधाळ जनावरे देखील अधिक आहेत यामुळे रब्बी हंगाम कसा येतोय याची आशा असताना चारा कसा उपलब्ध करावा हा प्रश्न कायम आहे.शासकीय योजनाची फक्त घोषणाचशासनाकडून विविध योजनाच्या घोषणा होत असल्या तरी परिसरात अजूनही कर्जमाफी, बोंडआळी अनुदान, दुष्काळी मदत, प्रधानमंत्री सन्मान निधि अश्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी शासकीय कार्यालय असो, बँका तसेच विका संस्था यांचे उंबरठे झीजवताना दिसत आहे. मात्र तरी देखील वेळीच मदत मिळालेली नाही. आता नुकसान भरपाई तरी वेळेवर मिळण्याची अपेक्षा आहे.परिसरातील सर्वच शेती उद्ध्वस्त झाली आहे माझे शेतातील देखील ज्वारी सह इतर पिके जमीनदोस्त झालीत परतीच्या पावसाने अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याने संकटाशी सामना करावा लागणार आहे.-भाऊलाल दगडू सापकाळेशेतकरी दापोरापाऊस चांगला झाला असला तरी तोंडातील घास घेऊन गेला आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे पूर्ण करून कोणताही भेदभाव न करता सर्वच शेतकºयांना पिकानुसार त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे.- परशुराम बळीराम काळे ,शेतकरी दापोराकपाशी पिके हिरवी दिसत असली तरी अधिक पावसाने कैºया मोठ्या प्रमाणात सड्लेल्या आहेत नवीन माल देखील गळून पडला असल्याने उत्पन्न सर्वच वाया गेल्याचे परिस्थित आहे त्यामुळे शासनाने कपाशी पिकासाठी सरसकट अधिकची मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.- ईश्वरदास बाबुराव तांदळे,शेतकरी दापोरा
गिरणाकाठवासीयांचा तोंडचा घास गेला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:22 IST