शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

भुसावळात कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने हटिया-पुणे एक्सप्रेसचा अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 20:16 IST

हटिया एक्सप्रेसच्या एका कोचच्या चाकाचे नटबोल्ट निघाले. ही बाब कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने या गाडीचा अपघात टळला.

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : गोरखपूरकडून पुण्याकडे जाणाºया हटिया एक्सप्रेसच्या एका कोचच्या चाकाचे नटबोल्ट निघाले. ही बाब कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने या गाडीचा अपघात टळला. गाडीपासून कोच वेगळा करून गाडी सुमारे अडीच तास उशिराने पुण्याकडे रवाना करण्यात आली.गाडी क्रमांक २२८४० ही गाडी भुसावळरेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक तीन वर येत होती. तेव्हा रोलिंग इनचे कर्तव्यावर असणारे कर्मचारी हे गाडीचे निरीक्षण करीत होते. या गाडीचा एसी कोच क्रमांक बी -२ च्या उजव्या बाजूचा एक्सल होल्डिंग आर्म तुटल्याचे लक्षात आले. ही माहिती कर्तव्यावर असणाºया कर्मचाºयांनी त्वरित वरिष्ठ अधिकारी, एसीएम अजयकुमार, डीसीआय सुदर्शन देशपांडे, सीटीआय एस.खरात, एओएम जे.एम.रामेकर, एसडी गोपी अय्यर हे त्वरित फलाट क्रमांक तीनवर आले. गाडीचे परीक्षण केल्यानंतर बी-२ हा डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला व सायंकाळी ५:५५ मिनिटांनी आलेली गाडी रात्री आठ ८:१५ मिनिटांनी म्हणजे तब्बल अडीच तासाच्या उशिरानंतर पुण्याकडे सोडण्यात आली.दरम्यान, प्रभावित डब्याचे प्रवासी अन्य इतर एसी कोचमध्ये बसविण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. त्यांना अडीच तासापर्यंत स्थानकावर ताटकळत थांबावे लागले.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ