याप्रसंगी संस्थेचे प्रतापराव हरी पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र न्यावबा पाटील, धर्मराज तुकाराम भोसले, युवराज नगराज भोसले, संजय भास्कर भोसले, किशोर रघुनाथ पाटील, अमोल बापूराव पाटील, डॉ. रावसाहेब मोरेश्वर पाटील व साधनाई फाउंडेशनचे संचालक हरिश रामेश्वर भोसले उपस्थित होते.
प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य आर. आर. वळखंडे यांनी केले. त्यानंतर स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छतेची शपथ सामूहिकरित्या घेण्यात आली. स्वच्छता अभियान व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धन, कोरोना महामारी उपाय, बेटी बचाव बेटी पढाव अशा विषयांवर ही रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण रंजना पाटील, अर्चना पाटील, सुषमा पाटील, प्रिया पाटील व भाग्यश्री भोसले यांनी केले.
ही स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली असून त्यातून विजेते काढण्यात आले. सूत्रसंचालन एस. पी. पाटील, संजीव सूर्यवंशी, प्रशांत सोनवणे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्राथमिक मुख्याध्यापक विलास पाटील, पर्यवेक्षक बी. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.
230921\img-20210923-wa0094.jpg
आमडदे ता भडगाव