शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 19:12 IST

तीन वर्षानंतर अखेर सुटला संयम : नेरी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

ठळक मुद्देदोन ठिकाणची पाणी योजना तरी गाव तहानलेलेचसंतप्त महिलांनी सरपंचांना बोलविले कार्यालयातजलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गाव तीन वर्षांपासून तहानलेले

आॅनलाईन लोकमतनेरी, ता.जामनेर, दि.२ : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील नेरी गावातील नागरिक तब्बल तीन वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी महिलांच्या संयमाचा बांध सुटला आणि संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. याठिकाणी उत्तर देण्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.गेल्या अनेक दिवसांपासून नेरी गावात तीव्र पाणी टंचाई भासत आहे. महिन्याभरात केवळ दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्या कल्पना कुमावत यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी गावातून हंडा मोर्चा काढत थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी पुलकेशी केदार, सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित नसल्याने मोर्चेकरी महिलांच्या संतापात भर पडली. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला थेट कुलूप ठोकले. संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप कायम होते.जलसंपदा मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावसुमारे १० हजार लोकसंख्या असलेले नेरी हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील गाव आहे. १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत भाजपाचे १२ सदस्य तर एकमेव राष्ट्रवादीच्या महिला सदस्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या पॅनलचे ग्रामपंचायतीत बहुमत आहे. मात्र तरीदेखील गेल्या तीन वर्षांपासून या गावातील नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.सरपंचांना बोलविले कार्यालयातग्रामपंचायत कार्यालयात मोर्चेकरी महिला दाखल झाल्याची माहिती पदाधिकाºयांना फोनवर देण्यात आली. तेव्हा सरपंच याचे पती रवींद्र पाचपोळ व उपसरपंच यांचे पती जितेंद्र पाटील यांनी संतप्त महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सरपंच व उपसरपंच यांना कार्यालयात बोलवा असा पवित्रा या महिलांनी घेतल्याने अखेर प्रभारी सरपंच उज्वला पाटील या कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून चाबी सोबत ठेवून घेतली.दोन ठिकाणची पाणी योजना तरी गाव तहानलेलेगावासाठी वाघुर धरण व चिंचखेडा शिवारातील एका खाजगी शेतातील विहिरीतून पाणी योजना सुरु आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी गावकरी तहानलेलेच आहे. वाघुर धरणातील आठ गाव पाणी पुरवठा योजना ही वीज बिलामुळे अडचणीत आली आहे. चिंचखेडा शिवारातून एका खाजगी शेतातील विहिरीतून पर्यायी पाणी योजना चालू आहे. मात्र ती देखील वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. मात्र वापरण्यासाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो.

 खाजगी शेतातील विहिरीतून होणाºया पाणी पुरवठ्याला वारंवार तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो. मात्र याबाबत लवकर कारवाई होवून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.उज्वला पाटील, प्रभारी सरपंच, नेरी.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगावJamnerजामनेर