शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

अमळनेर तालुक्यात दीड तास अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:44 IST

पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली.

ठळक मुद्देपाडळसरे कळमसरेसह परिसरात ढगफुटीमारवड सर्कलला एका तासात १०० मि.मी. पावसाची नोंदतहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी दिली कळमसरे पाडळसरे येथील ग्रामस्थांची भेट देऊन दिला धीरकळमसरे गावासह तिन्ही गावांचा संपर्क तुटलाअनेक घरांची पडझड, उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

अमळनेर, जि.जळगाव : पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. यात अनेक शेतांचे बांध व जलसंधारणची कामे फुटून शेतीसह पिकांना मोठा फटका बसला असून मोठे नुकसान झाले, तर पाडळसरे-कळमसरेसह बोहरे या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. निम, तांदळी, बोहरे या गावांना जाणाºया रात्रीच्या बसेस मारवड येथे थांबून आहेत. त्यामुळे अनेक महिला व प्रवासी रस्त्यातच ताटकळत बसले असल्याने वाहक व चालकही थांबून आहेत.या घटनेची माहिती अमळनेरच्या तहसीलदार यांना कळमसरे पाडळसरे येथील पत्रकारांनी दिली असता अमळनेर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व तीन बंब घेऊन रवाना झाले. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, मारवडचे मंडळ अधिकारी बी.आर.शिंदे, तलाठी गौरव शिरसाठ हे दाखल झाले. घरे कोसळलेल्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करून कळमसरे पाडळसरे येथील ग्रामस्थांची भेट देऊन धीर दिला व प्रशासन आणि यंत्रणा आपल्यासोबत असल्याने घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणून जागृत केले. कळमसरे पाडळसरे येथे सात आठ घरे कोसळले. त्यात मात्र जीवित हानी झाली नाही. सखल शेतीत पाणी तुडुंब भरल्याने पिके पाण्याखाली आली आहेत.पाडळसरे, बोहरे, कळमसरेसह परिसरातील गावांच्या संपर्क तुटला आहे. गावातील अनेक घरात पावसाचे पाणी आत शिरले आहे. कळमसरे भिलाटी, दुर्गानगर प्लॉटिंग येथे पावसाचे पाणी घरात शिरले आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जवळपास डझनभर घरे ही पावसाच्या पाण्याने पडली आहे. कळमसरे गावाला पावसाच्या पाण्याचा संपूर्ण वेढा असल्याने अमळनेर-शिरपूर बसही कळमसरे-शाहपूर रस्त्यावर उशिरापर्यंत उभी होती. तसेच अमळनेर-निम बस ही पाण्यात अडकली आहे. अचानक जणू काही ढगफुटी झाली की काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. या पावसाने संपूर्ण शेती ही पाण्याखाली आली आहे. कपाशी, मका, ज्वारी, बाजरीसह इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामस्थानी नुकसान भरपाईची मागणी करीत, शेतीच्या पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनीे तहसीलदार व प्रांत अधिकाºयांकडे केली आहे.तीन घरे पडलीकळंबे गावात पण पावसाच्या पाण्याने तीन घरे पडली. त्यात गोरख बुधा पारधी, राजकोरबाई कौतिक शिरसाठ व अशोक देवीदास पारधी यांचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसAmalnerअमळनेर