शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा तास दुकानात थांबून जळगावात चोरट्याने लांबविला ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:20 IST

अंगात जॅकेट, डोक्यात टोपी व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्याने ख्वॉजामिया दर्गा परिसरातील युनिटी चेंबरमधील सदगुरु कृपा मोबाईल हे दुकान फोडून त्यातील ३३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, सात हजार रुपये किमतीचे मोबाईल अ‍ॅसेसरीज व १० हजार ५०० रुपये रोख असा ५० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देख्वॉजामिया दर्गा परिसरातील दुकान फोडलेचोरटा ‘सीसीटीव्ही’त कैदचोरट्यांनी टॅमीने तोडले कुलूप

जळगाव : अंगात जॅकेट, डोक्यात टोपी व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्याने ख्वॉजामिया दर्गा परिसरातील युनिटी चेंबरमधील सदगुरु कृपा मोबाईल हे दुकान फोडून त्यातील ३३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, सात हजार रुपये किमतीचे मोबाईल अ‍ॅसेसरीज व १० हजार ५०० रुपये रोख असा ५० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.दरम्यान, पहाटे ४.४० वाजता चोरटा दुकानात शिरला आहे तर ५.१० वाजता तो चोरी करुन दुकानाच्या बाहेर पडला आहे. तब्बल ३० मिनिटे चोरटा दुकानात होता. त्याची प्रत्येक हालचाल दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुकान मालक विकास काशिनाथ मराठे (वय ३४, रा.जुना खेडी रोड, जळगाव) यांनी जिल्हा पेठ पोलिसांकडे तक्रार दिली. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे सादर केले.चोरट्याने सर्वात आधी शटरचे दोन कुलुप टॅमीने तोडले आहेत. त्यानंतर दुकानात शिरल्यावर काचेच्या दरवाजाचे कुलुप तोडले. प्रत्येक ड्रावर तपासून त्याने १० हजार ४०० रुपये रोख काढले त्यानंतर तीन मोबाईल काढून बॅगेत टाकले. या दुकानात तीन लाखाच्यावर साहित्य होते, मात्र त्याने मोबाईल, रोकड व मोबाईल संबंधित अ‍ॅसेसरीज लांबविले आहे. ईश्वर महाजन यांची नाश्त्याची गाडी दुकानाच्या बाहेर लागते. सोमवारी सकाळी सात वाजता ते गाडी लावत असताना शटर अर्धवट दिसले व कुलुप तुटलेले होते. त्यांनी लागलीच विकास मराठे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मराठे यांनी दुकानात येऊन सामान, मोबाईल व रोकड तपासली असता गायब होती.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी