शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडी ग्रामपंचायत कार्यालयाजवळच हागणदारी मुक्ती व स्वच्छतेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:17 IST

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण : वरखेडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने फलकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकून ग्रामपंचायतच्या संदेशाला हरताळ फासला आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ग्रामपंचायतीने हा कचरा उचलण्याची तसदीदेखील घेतलेली नाही.

ठळक मुद्देवरखेडी ग्रामपंचायत कार्यालयाजवळची परिस्थितीरहिवाशांद्वारे केरकचरा आणून टाकला जातो

हेमशंकर तिवारीवरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : वरखेडी ग्रामपंचायत कार्यालयाला लागूनच हगणदारी व गावातील रहिवाशांद्वारे केरकचरा आणून टाकला जातो. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर जिल्हा परिषदेतर्फे लावण्यात आलेला ‘खतासाठी खड्डा करू, कचºयाची योग्य व्यवस्था करू. तसेच स्वच्छ व हागणदारी मुक्त गावात आपले सहर्ष स्वागत’ या फलकांची प्रतारणा होताना दिसून येते.गावातदेखील बºयाच ठिकाणी स्वच्छ गाव संकल्पनेला अशाच प्रकारे छेद जातो. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे ग्रामपंचायतीला मरगळ आल्याची परिस्थिती आहे. यामुळे ग्रामस्थांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असून गावातील बरेच खांबांवरील पथदीवे बंद आहेत. यामुळे अंधाराचे साम्राज्य असते. वारंवार याबाबत सांगूनदेखील नवीन पथदिवे लावण्यात आलेले नाही, अशी ग्रामस्थांची ओरड आहे.

टॅग्स :Healthआरोग्यPachoraपाचोरा