शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत पकडला १४ लाखाचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 12:41 IST

जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजता छापा टाकला. त्यात १३ लाख ६८ ...

जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजता छापा टाकला. त्यात १३ लाख ६८ हजार १२० रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा मालक विजय मिश्रा याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.एमआयडीसीत एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना मिळाला होती. त्यावरुन ही धडक कारवाई करण्यात आली.अधिकाऱ्यांनाच फक्त कारवाईचे ठिकाण व स्वरुप माहिती होते, त्यामुळे सोबत असलेल्या पथकातील कोणालाच त्याची माहिती देण्यात आली नव्हती. पथकाला थेट गोदामावर नेण्यात आल्यावर कारवाई करण्यात आली. चौकशीत हे गोदाम व साठा विजय मिश्रा (रा.शाहू नगर) यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली.या कारवाईत सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व पोलीस अधीक्षकांचे वाचक सिध्देश्वर आखेगावकर, सहायक फौजदार चंद्रकांत पाटील, रवींद्र घुगे, महेश महाजन, किरण चौधरी, दर्शन ढाकणे यांच्यासह सहायक फौजदार विनयकुमार देसले, सुनील चाधरी, अशोक फुसे, प्रवीण पाटील, जमील खान, रवींद्र पाटील, भूषण मांडोळे, आसिफ पिंजारी व भरत डोळे यांचा समावेश आहे.गुटख्यातून कोट्यवधीची उलाढाल सट्टा, दारु यासह गुटख्याची अवैध विक्री शहरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परराज्यातून कंटेनर भरुन गुटखा शहर व परिसरात आणला जात आहे. तेथून सकाळी ५ ते ७ या वेळेत लहान वाहनातून गुटखा किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचविला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव