शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

'विधानसभे' पूर्वीच जळगावात गुलाबराव पाटील विरुद्ध देवकरांचा सामना रंगणार...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 14:54 IST

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, आता अंतिम पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जळगाव:  जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर, आता अंतिम पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिवसेना शिंदे गट यांच्यात आमने- सामने लढत होणार आहे. यामध्ये सर्वांत मोठी लढत पालकमंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध छाया गुलाबराव देवकर यांच्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच दूध संघात या लढतीकडे लक्ष राहणार आहे.

जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच राजकारण तापले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वपक्षीयच्या चर्चेवरून आता थेट आमने- सामने लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत खडसेंना सोबत न घेण्याचाच निर्णय घेण्यात आला. तसेच भाजप- शिंदे गटाच्या संभाव्य पॅनलमधील उमेदवारांबाबतदेखील चाचपणी झाली होती. या बैठकीनंतर महाविकास आघाडीकडूनदेखील स्वतंत्र पॅनलबाबत चर्चा सुरू झाली असून, आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी देखील मविआकडून तयार झाली आहे. या संभावित उमेदवारांची यादी 'लोकमत'च्या हाती लागली आहे.

दिग्गज भिडणार आमने- सामने

१. जळगाव तालुका मतदारसंघातून छाया गुलाबराव देवकर यांच्यासह महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

२. दोन्ही उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज या मतदारसंघात कायम राहून दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज महिला राखीवमधून कायम राहू शकतो. जर मालती महाजनांचा महिला राखीवमधील अर्ज कायम राहिल्यास, जळगाव तालुक्यात छाया गुलाबराव देवकर यांचा अर्ज कायम राहील. 

३. याच मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रतिस्पर्धी आमनेसामने येण्याची शक्यता आहे किंवा मालती महाजन विरुद्ध गुलाबराव पाटील यांच्यातही लढत होण्याची शक्यता आहे. 

४. यासह दिलीप वाघ विरुद्ध किशोर पाटील, सतीश पाटील विरुद्ध चिमणराव पाटील, मंदाकिनी खडसे विरुद्ध मंगेश चव्हाण यांच्यातही लढत होण्याची शक्यता आहे. 

मविआचे हे असू शकतात उमेदवार

मुक्ताईनगर - मंदाकिनी खडसेचाळीसगाव - प्रमोद पाटीलअमळनेर - आमदार अनिल पाटीलभडगाव - डॉ. संजीव पाटील पाचोरा - माजी आमदार दिलीप वाघपारोळा - माजी आमदार डॉ. सतीश पाटीलजळगाव - छाया गुलाबराव देवकर किंवा मालती महाजनजामनेर - दिनेश पाटील किंवा नाना राजमल पाटीलबोदवड - अॅड. रवींद्र पाटीलयावल - हेमराज चौधरीरावेर - जगदीश बढेभुसावळ - शामल झांबरेचोपडा - इंदिराताई पाटील किंवा रवींद्र पाटीलएरंडोल - अमर जैन किंवा नाना महाजनधरणगाव - वाल्मिक पाटील किंवा ओंकार मुंदडाएसटी - श्रावण ब्रम्हे

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना