शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून मृत्यू पावलेल्या आडगांव येथील तरुणांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडून सात्वंन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 21:44 IST

जळगाव  - आडगाव, ता. एरंडोल येथील रविंद्र प्रभाकर महाजन (वय 22) व महेंद्र उखर्डू पाटील (वय 23) या तरुणांचे ...

जळगाव  - आडगाव, ता. एरंडोल येथील रविंद्र प्रभाकर महाजन (वय 22) व महेंद्र उखर्डू पाटील (वय 23) या तरुणांचे अंगावर वीज पडल्याने शनिवारी दुर्दैवी निधन झाले. मृत झालेल्या दोन्ही तरुणांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली व कुटूंबियांचे सात्वंन केले.दोन्ही तरुण मुलांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असून शासन कुटूंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी या कुटूंबाला दिली. तसेच या दोन्ही तरुणांच्या कुटूंबियांना शासनामार्फत मिळणारी तातडीची मदत लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिलेत. यावेळी पंचायत समिती सभापती अनिलभाऊ महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमळीस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील, जगदीश पाटील, महानंदा पाटील, वासुदेव पाटील आदि उपस्थित होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव