जळगाव : जिल्ह्यातील कोळन्हावी, शिरागड, पिंप्री, बोरावल बुद्रुक, भालशिव या पाच गावात गत १८ वर्षांपासून ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड होऊ शकलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून न्याय मिळत नसल्याने मानवी अन्याय निवारण केंद्राचे उमाकांत वाणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या पाच गावांच्या नागरिकांना व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागत असते. ४ी ग्रामपंचायतींवर १८ वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. हा या गावातील नागरिकांवर अन्याय असून याप्रश्नी सतत धरणे, उपोषण, सत्याग्रह करून दुर्लक्ष होत असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नूतन मराठा कॉम्प्लेक्समधील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या गावांमधील रवींद्र सोनवणे, विजय जाधव हेदेखील उपस्थित होते. बुधवारीदेखील हे आंदोलन सुरूच रहाणार असल्याचे उमाकांत वाणी यांनी सांगितले.
जळगावात पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:23 IST
५ गावांच्या हक्कासाठी लढा
जळगावात पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे
ठळक मुद्देआंदोलन वारंवार पाठपुरावा