नशिराबाद : येथील शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी जनार्दन माळी यांची निवड झाल्याबद्दल समस्त माळी पंचतर्फे त्यांचा सत्कार ह.भ.प. सुनील शास्त्री महाराज यांनी केला. यावेळी दिना चौधरी, गणेश चव्हाण, सोपान महाजन, सुरेश माळी, अनिल माळी, प्रवीण महाजन, पंढरी पाटील, सुरेश माळी, पांडुरंग बावस्कर, गणेश माळी, सुभाष माळी, भाईलाला चौधरी व सुकलाल महाजन माळी पंच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
—————————
नशिराबादला रोटरी ईस्ट व रोटरी इलाईट या संस्थेतर्फे विज्ञान उपकरण यांची देणगी भेट
नशिराबाद : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रोटरी क्लब जळगाव इलाईट या संस्थेतर्फे रोटरीयन स्व. मयूर गांधी यांच्या स्मरणार्थ रोटरी सदस्य किशोर महाजन यांनी रुपये १० हजारांचे विज्ञान उपकरण साहित्य न्यू इंग्लिश स्कूल शाळेला सप्रेम भेट दिले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जनार्दन माळी होते. रोटरी ईस्टचे प्रेसिडेंट वीरेंद्र छाजेड, प्रोजेक्ट चेअरमन विजय कुकरेजा, सेक्रेटरी प्रणव मेहता, रोटरी क्लब जळगाव ईलाईटचे प्रेसिडेंट नितीन इंगळे, प्रोजेक्ट चेअरमन धनंजय ढाके, सेक्रेटरी सचिन असोदेकर यांच्यासह रोटरी सदस्य सचिंद्र चौधरी, प्रीतेश चोरडिया, अजित महाजन, नीलेश झवर आणि सनी गांधी, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष जनार्दन माळी व उपमुख्याध्यापक सी. बी. अहिरे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. यावेळी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, संचालक राजेंद्र पाटील, प्रमिला महाजन, सुनीता पाटील, आदी उपस्थित होते. पर्यवेक्षक बी. आर. खंडारे यांनी आभार मानले.
नशिराबाद टोल बूथवर भूमिपुत्रांना नोकरी द्या
नशिराबाद : राष्ट्रीय महामार्गावर आगामी काही दिवसांतच सुरू होत असलेल्या टोल बूथवर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेले आहेत. त्यांना सहानुभूती म्हणून आपण स्थानिक भूमिपुत्रांना स्टॉल बूथवर सर्वप्रथम नोकरीसाठी प्राधान्य द्यावे व रोजगार द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन मनसेने महामार्गाचे प्रकल्प संचालक यांना दिले आहे. प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना निवेदन देताना मनसे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, आशिष सपकाळे, कुणाल पाटील, मनविसे शहराध्यक्ष योगेश पाटील, राजेंद्र डोंगरे, दीपक हिवराळे, गौरव जोनवाला, आदी उपस्थित होते.