शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

विद्यापीठाचा मोठा निर्णय ; १ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 3:34 PM

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शनिवारी महत्वाचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि ...

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शनिवारी महत्वाचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ लक्षात घेऊन विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, परिसंस्था मधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे मार्च-एप्रिल-मे, २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे सरसकट परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. अंदाजे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार नोव्हेंबर रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा सेना, दर्जी फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच या संघटनांकडून अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ? माफ करण्यात यावे ही अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली होती. या बैठकीत या संघटनांच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे बहुसंख्य पालक शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका दिलीप पाटील यांनी मांडली. प्राचार्य एल.पी. देशमुख, दीपक पाटील,प्रा.नितीन बारी व इतर सदस्यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठाने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. आता खान्देशात अतिवृष्टीचे संकट लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, असे मत व्यक्त झाले. चर्चेअंती परिक्षेत्रातील संलग्नित सर्व महाविद्यालये,परिसंस्थांमधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे मार्च-एप्रिल-मे, २०२० मध्ये होणाºयापरीक्षांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची ही संख्या अंदाजे १ लाख ७५ हजार एवढी आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परीक्षांच्या कामाचे मानधन प्राध्यापकांनी घेऊ नये, असे आवाहन प्राध्यापकांच्या दोन्ही संघटनांना व्यवस्थापन परिषद सदस्यांच्यावतीने करण्याचेही ह्या बैठकीत ठरले.या बैठकीस प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, दिलीप पाटील, प्रा.रत्नमाला बेंद्रे, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.नितीन बारी, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ.जे.बी.नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल,तंत्रशिक्षणचे प्रभारी संचालक बी.पी.नाथे, कुलसचिव भ.भा.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव