शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कृतज्ञता म्हणजे हृदयातील परमेश्वराचे सिंहासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 20:02 IST

आपल्या अंतर्मनाला सकारात्मक उर्जेची जोड देवून निर्माण होणारी चैतन्यशक्ती हीच खरी आहे. म्हणून आचार, विचार व उच्चाररूपी सत्कर्म केल्यास खरे समाधान मिळते.

ठळक मुद्देजीवन विद्या मिशनतर्फे तन, मन, धन कार्यशाळापितृपक्ष म्हणजे आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा पुण्यकाल

रावेर, जि.जळगाव : आपल्या अंतर्मनाला सकारात्मक उर्जेची जोड देवून निर्माण होणारी चैतन्यशक्ती हीच खरी ईश्वरशक्ती असून, प्रत्येक माणसात परमेश्वर दडला आहे. म्हणून आचार, विचार व उच्चाररूपी सत्कर्म केल्यास खरे समाधान मिळते.म्हणून सर्वांची अर्थात समाजातील प्रत्येक घटकाची कृतज्ञता मानून समाधानाची कास धरल्यास खरा विकास होतो. किंबहुना पुण्य हेच समाधान असून, पुण्याईतूनच मन:शांती लाभत असल्याने खरी पुण्याई प्राप्त होत असते. म्हणून कृतज्ञता हेच खरे हृदयातील परमेश्वराचे सिंहासन असल्याचे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे नामधारक दशरथ शिरसाठ यांनी व्यक्त केले.येथील शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित जीवन विद्या मिशनतर्फे आयोजित तन-मन-धन या कार्यशाळेत ते बोलत होते.प्रारंभी, जीवन विद्या मिशनचे विश्वस्त संतोष सावंत, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, जळगाव शाखेच्या अध्यक्षा कुंदा नारखेडे, जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक बी.एस.पाटील, कृष्णा म्हसकर व दशरथ शिरसाठ यांच्या हस्ते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीपप्रज्वालन करण्यात आले.प्रारंभी, कृष्णा म्हसकर यांनी ‘तन’ या विषयावर बोलताना निसर्गाने बनवलेली ही एक पद्धतशीर व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, तन-मन-धन हा त्रिकोण एकमेकांना पूरक आहे. तन व मन निसर्गाने दिलेले भांडवल आहे. त्यांच्या बळावर धन संपादन करावयाचे असते. लहानपणापासून तू भरपूर मोठा हो, अशी जी अपेक्षा व्यक्त करतो ती त्याच अर्थाने करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामकृष्ण परमहंस यांना पैशाची अ‍ॅलर्जी होती. आता मात्र एनर्जी वाटत असल्याची खंत व्यक्त करून सुधीर फडके यांच्या ‘दाम करी काम रे..’ या गाण्याच्या पंक्ती त्यांनी म्हणून सादर केले.पैसा किती व कसा आहे? पैशासाठी जीवन आहे की जीवनासाठी पैसा आहे? हे अंतर्मुख करणारे प्रश्न असून, धन म्हणजे पैसा, संपत्ती व मुलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फक्त पैशाने माणूस सुखी होतो का? तर नाही. गडगंज पैसा असताना स्वास्थ्य नसल्याचे आपण पाहतो. जीवनात सुख सोयी असेल तर आत्मशांती लाभते. म्हणून सोयी सुविधा किती असाव्यात? किती सोयी सुविधा मिळवायचे? याबाबत माणसाचे विचार करण्याची गरज असून, सोयीसुविधा अधिकाधिक न मिळवता त्याचा आनंद उपभोगता येईल. एवढ्या सोयी सुविधा असाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.विश्वस्त संतोष सावंत यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक बी.एस.पाटील, जे.आर.पाटील, मोरगाव येथील उद्योजक आर.एस. पाटील, अमोल महाजन, रमेश महाजन, प्रवीण पाटील, जळगाव शाखेच्या अध्यक्षा कुंदा नारखेडे, पंढरीनाथ वानखेडे, सचिव, खजिनदार रवी पाटील, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.पितृपक्ष म्हणजे आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा पुण्यकाल मानला जातो. श्राध्द म्हणजे श्रध्दा. मात्र आईवडिलांना जिवंतपणी सन्मान देणे हीच खरी कृतज्ञता आहे. कृतज्ञतेला समाधानाची कास धरल्याशिवाय विकास अशक्य असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर