शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आजी,माजी लोकप्रतिनिधींवरही अटकेची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ठेवीदारांच्या पावत्या कमी किमतीत विकत घेऊन त्या कर्जात समायोजित केल्याच्या प्रकरणात सराफ तथा हॉटेल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ठेवीदारांच्या पावत्या कमी किमतीत विकत घेऊन त्या कर्जात समायोजित केल्याच्या प्रकरणात सराफ तथा हॉटेल व्यावसायिक भागवत गणपत भंगाळे, दालमील असोसिएशनचे प्रेम रामनारायण कोगटा, जयश्री शैलेश मणियार यांच्यासह ११ जणांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आजी, माजी लोकप्रतिनिधी यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील या बड्या लोकांनी बीएचआरमधून नियम डावलून कोटीच्या घरात कर्ज घेतले आहे. सीआयडीच्या फॉरेन्सीक फ्रॉड डीटेक्शन ऑडीट रिपोर्टमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. येत्या काही दिवसांत त्यांनाही गुन्ह्यात आरोपी केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अटकेतील या सर्व जणांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अटकेतील संशयितांनी एजंटच्या माध्यमातून पतसंस्था बुडाल्याचे वातावरण तयार करुन ठेवीदारांच्या २० ते ३० टक्क्यात पावत्या खरेदी करुन पूर्ण रक्कम मिळाल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. या साखळीत एजंट, कर्जदार, प्रशासक यांच्यासह आणखी काही इतरांचा समावेश असल्याचे उघड झालेले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आतापर्यंत अटक केलेल्यांचा आकडा सतरावर पोहचला आहे.

प्रमोद कापसेची चौकशी सुरुच

दरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी ,भुसावळ, औरंगाबाद, मुंबई, अकोला व पुणे येथे एकाच वेळी धाडसत्र राबविले. यात १२ जणांना ताब्यात घेतले. एकूण ११ जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. १२ वी व्यक्ती प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांची अजूनही चौकशी सुरु आहे. यात त्यांनी काही कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली आहेत. त्यात त्याचे दूरचे नातेवाईक गुंतलेले आहेत, त्यामुळे कापसे भूमिका अजून स्पष्ट झालेली नसल्याने त्याला अजून अटक केली नसल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, बीएचआरशी संबंधित अकोल्यात देखील काही वर्षापूर्वी २६ जणांवर गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.

एजंटही आले रडारवर

तपासात बड्या कर्जदारांसोबतच ठेव पावत्या कमी किमतीच खरेदी करुन त्या बड्या कर्जदारांना देऊन त्यांचे कर्ज नील दाखविण्यात एजंट लोकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सेटलमेंट करणारे एजंट देखील रडारवर आलेली आहेत. तपासात अनेक एजंटांची नावे समोर आलेली असून पोलिसांनी ही नावे न्यायालयातही सांगितलेली आहेत. त्यामुळे बडे कर्जदार असलेले लोकप्रतिनिधी यांच्यासोबतच या एजंटवर अटकेची टांगती तलवार आहे.

कोट....

प्रमोद कापसे याची चौकशी सुरु आहे. त्याने काही कागदपत्रे सादर केलेली आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. अटकेतील ११ जणांची चौकशी सुरु आहे.

-भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे