शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलवर आजीच्या भेटीसाठी आलेली नात ट्रकखाली चिरडून जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 20:14 IST

मोटारसायकलवर आजीच्या भेटीसाठी आलेली नात ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाली.

ठळक मुद्देभोकरी फाट्यावरील घटना,पतीच्या पायाचा चेंदामेंदा होऊन गंभीर जखमीट्रकचालकाला अटक 

रावेर : लहानाची शहाणी होईपर्यंत आईची आई असलेल्या केर्‍हाळे खुर्द येथील वृध्द आजीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने नात आपल्या पतीसमवेत मामाकडे  दोन दिवस मुक्कामी राहून आजीची अंतिम भेट घेऊन परत जात असताना, ट्रकने मोटारसायकलला धडक देत खाली पडलेल्या ३८ वर्षीय नातीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पतीही एका पायाचा ट्रकखाली चेंगरून चेंदामेंदा झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रावेर-बर्‍हाणपूर राज्य महामार्गावरील भोकरी फाट्यावर रविवारी दुपारी १ :५० वाजेच्या सुमारास घडली.  पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील निंभोरासीम येथील माहेरवाशीण असलेल्या तथा मध्य प्रदेशातील मंगलाबाई सोपान शिरसाठ (वय ३८, रा. वख्खारी, ता.जि.बर्‍हाणपूर) या आपले पती सोपान कडू शिरसाठ यांच्यासमवेत तालुक्यातील केर्‍हाळे खुर्द येथील त्यांच्या मामाच्या घरी लहानपणी संगोपन केलेल्या व अंथरुणावर खिळून असलेल्या वृध्दा आजीच्या भेटीसाठी दोन दिवसांपासून मुक्कामी होत्या. दरम्यान, आज पतीसह मोटारसायकल (एमपी-१२-एमडी-९१५८) ने घरी जाण्यासाठी निघाल्या. तेव्हा भोकरी फाट्यावर वळण घेण्याच्या बेतात असताना त्यांच्या मोटारसायकलला रावेरकडून बर्‍हाणपूरकडे भरधाव वेगात येणार्‍या ट्रक (एमपी-०७/एचबी- ३३७१) ने जबर धडक दिली. त्या भीषण अपघातात मोटारसायकलवर खाली पडलेल्या मंगलाबाई सोपान शिरसाठ (वय ३८) रा. वख्खारी, ता. जि. बर्‍हाणपूर यांचा भरधाव वेगातील ट्रकखाली चेंगरून जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती सोपान शिरसाठ यांच्या एका पायाचा चेंदामेंदा होवून गंभीर जखमी होऊन मोटारसायकलचे नुकसान झाले. ही दुर्घटना ३ जानेवारी रोजी दुपारी १:५० वाजेच्या सुमारास बर्‍हाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावरील भोकरी फाट्यावर घडली.        गंभीर अत्यावस्थेतील जखमी सोपान कडू शिरसाठ यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता औषधोपचार करून जळगावला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.      रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी.महाजन यांनी मयत विवाहीतेचे शवविच्छेदन केले. मृतदेह आप्तेष्टांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी मयत विवाहीतेचा मामेभाऊ देवानंद नारायण तायडे रा.केर्‍हाळे खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात ट्रकचालक आरोपी रामप्रतापसिंग जगदीश यादव (रा.गोरमी गोरम, ता.मेहगाव, जि.भिंड, म.प्र.) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पो.नि.रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर जाधव, नीलेश चौधरी तपास करीत आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातRaverरावेर