शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे रेशन यादीच्या घोळावरून ग्रामसभेत दांगडो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:37 IST

वाढीव यादीसह श्रीमंताची नावे रद्द करण्याबाबत केला ग्रामसभेत ठराव

ठळक मुद्देसंतप्त महिलांनी घातला सरपंचांना घेरावसंतप्त महिलांनी अर्धा तास केला रास्तारोकोसरपंचांनी घेतला काढता पाय

आॅनलाईन लोकमतपाळधी, ता.जामनेर,दि.२८ : रेशनदुकानाच्या यादीत घोळ करून गरजू लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप संतप्त महिलांसह नागरिकांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर ग्रामसभेत गुरुवारी केला. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तणावाचे वातावरण होऊन गोंधळ उडाला. यादरम्यान सरपंचांनी वाढीव यादीसह श्रीमंतांचे नावे रद्द करण्याचे जाहीर करीत सभा बरखास्त केली. त्यानंतर संतप्त महिलांनी रास्तारोको आंदोलन केले.रेशनधान्य वाटप, लाभार्थ्यांची मुळ यादी व वाढीव यादीचे वाचन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी दहा वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच डिगंबर माळी, ग्रामसेवक आर.जी.पवार, सुभाष परदेशी, योगेश पाटील, अमित पाटील, विठ्ठल पाटील, आसिफ पठाण, उपसरपंच जायदा मस्तान तडवी, सचिन पाटील यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.संतप्त महिलांनी घातला सरपंचांना घेरावसरपंच व सदस्यांनी गरजू लोकांचे नावे वगळून त्यांचे नातेवाईक व हितचिंतकांची नावे रेशनच्या यादीत दिले आहे. खºया लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याने नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला. संतप्त महिलांनी सरपंचांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. वंचित लाभार्थी राधा अनिल उदमले या भूमीहीन असून पती अपंग आहेत. कार्ड असूनही त्यांना रेशनचे दीड वर्षांपासून धान्य दीड मिळत नाही.

सरपंचांनी घेतला काढता पायवाढता गोंधळ लक्षात घेऊन सरपंच माळी यांनी वाढीव यादीच्या लाभार्थ्यांसह श्रीमंतांची नावे रद्द करण्याचा ठराव केला. तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड सर्व्हेक्षण करून करण्यात येईल असे जाहिर केले. सभा बरखास्त झाल्याचे जाहीर करीत संतप्त महिलांनी पुन्हा माळी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. सरपंच माळींनी तेथून काढता पाय घेतला.संतप्त महिलांनी अर्धा तास केला रास्तारोकोसंतप्त महीलांनी ग्रामपंचायत मधून मोर्चा काढत जळगाव-औरंगाबाद महामार्गावर ठिय्या दिला. महिला ऐकण्याच्या मनस्थित नसल्याने तब्बल अर्धा तास रहदारीचा खोळंबा झाला. अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी महिलांची समजूत काढली. त्यानंतर दुपारी एक वाजता रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी भेट देऊन संतप्त महिलांचे म्हणणे ऐकून घेत योग्य कारवाईचे आश्वासन दिले.

 वाढीव ४२ लाभार्थ्यांच्या यादीसह श्रीमंत लाभार्थ्यांची नावे रद्द करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. योग्य प्रक्रिया राबवून गरजू लाभार्थी निवडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविला जाईल.डिगांबर माळी, सरपंच, पाळधीश्रीमंत व राजकारण्यांच्या नातेवाईकांना रेशनकार्डचा लाभ मिळत आहे. मात्र गरजू लाभार्थी वंचित राहत आहे. गरीबांना घरोघर जावून रेशनकार्डाचे समान वाटप करा किंवा रेशनिंग बंद करा. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकाºयांकडे जाऊन दाद मागणार आहोत.सविता प्रकाश परदेशी, वंचित लाभार्थी.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर