शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

जि.प. अध्यक्ष निवडीचा वाढतोय सस्पेंस, सेनेच्या एक महिला सदस्या सोबत भाजपचा ‘महा’ दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 11:57 IST

भाजपचे चार सदस्य राष्ट्रवादीसोबत !

जळगाव : जिल्हा परिषदेच्या तीन पक्षांचे ५२ सदस्य सहलीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपकडून फोडाफोडीचे दावे अधिकच तीव्रतेने होत आहे़ भाजपचे चार सदस्य आमच्या सोबत आहेत असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात असतानाच आता शिवसेनेच्या एक महिला सदस्या व राष्ट्रवादीचे तीन सदस्य आमच्या सोबत असल्याचा प्रतिदावा भाजपकडून होत आहे़या सर्व प्रकारामुळे जि़ प़ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा सस्पेंस अधिक वाढला आहे़ राष्ट्रवादी व सेनेच्या दोन सदस्यांच्या अपात्रेला स्थगिती मिळविण्यासाठी हालचाली होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोल्हे हिल्सवरून भाजपच्या सदस्याचां ताफा रवाना झाला़ यात २९ सदस्य खाजगी बसने रवाना झाले होेते़ त्यापैकी समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे हे चारचाकी वाहनाने रवाना झाले़ अन्य तीन सदस्य आधीच मुंबई येथे रवाना करण्यात आले होते़ या तीन सदस्यांशी राष्ट्रवादीने संपर्क साधला होता, त्यामुळे त्यांना माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे रविवारीच पाठविण्यात आले होते़, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली़ हे सदस्य नाशिक येथे गेल्याचे समजते़ राष्ट्रवादीच्या अमळनेर येथील महिला सदस्या या सहयोगी म्हणून आमच्यासोबत आहेतच शिवाय अन्य एक महिला सदस्या व अन्य एक सदस्या आमच्यासोबत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे़ शिवसेनेच्या सदस्या फुटल्याचा दावा भाजपकडून झाल्याने खळबळ उडाली आहे़दरम्यान, भाजपकडून पल्लवी सावकारे यांच्या नावाचा सदस्यांकडून आग्रह वाढला आहे़ यात एकनाथराव खडसे यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे़मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर आव्हानआमदार गुलाबराव पाटील यांनी सोमवारीच मंत्रीपदाची शपथ घेतली. ते १ जानेवारीला जळगावात सेनेचे आमदार व सर्व जि़ प़ सदस्यांची बैठक घेणार आहे़ अवघे दोन दिवसत हातात असल्याने जिल्हा परिषदेत सत्ताबदल करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या सदस्यांचेही लक्ष मंत्री पाटील यांच्या भूमिकेकडे लागले आहे़ राज्यात सत्ता असताना जिल्ह्यात विरोधात राहावे लागल्यास हा मोठा पराभव असेल, असे काही सदस्यांचे म्हणणे आहे़मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी दक्षतामंत्रीमंडळ विस्तार होऊन गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेत सत्तापरिवर्तनाच्या हालचाली अधिक गतिमान होतील, म्हणून मंत्री मंडळाच्या विस्ताराच्या आधीच भाजपने त्यांच्या सदस्यांना जिल्ह्यातून बाहेर हलविले़ मात्र, सहलीला किती सदस्य सोबत आहेत, यावरून अध्यक्ष ठरणार आहे.अजित पवारांकडेही प्रकरण जाणार?अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दोन महिला सदस्या भाजपसोबत आहेत़ या दोनही सदस्यांना परत आणण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादीचे नेते हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन जळगावातील राजकीय समिकरणे बदलविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते़ भाजपचे चार सदस्य राष्ट्रवादी सोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.राष्ट्रवादीचे सर्व सदस्य एकत्र असून ते फुटण्याचा प्रश्नच नाही़ राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस मिळून शंभर टक्के सत्ता स्थापन करू यात शंका नाही़- शशिकांत साळुंखे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :Jalgaonजळगाव