शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

शासनाची भरड धान्य खरेदी योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

अमळनेर : शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला, तरी खरेदी सुरू न ...

अमळनेर : शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला, तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे, तर काहींना कमी भावात खुल्या बाजारत धान्य विक्री करावे लागत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत.

राज्य शासनाने भरड धान्य खरेदी योजनेत ज्वारी, मका, गहू खरेदी योजना सुरू करून, १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन नावे नोंदणी सुरू केली होती. नावे नोंदणीस मुदतवाढ मिळणार नाही, असे सक्त ताकिदीचे पत्र ही जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगरे यांनी दिले होते. शासनाने हायब्रीड ज्वारीसाठी २,६२० रुपये, माल दांडी ज्वारीसाठी २,६४० रुपये, मका १,८५० रुपये, गहू १,९७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. अमळनेर तालुक्यात ५८९ शेतकऱ्यांनी मक्यासाठी नोंदणी तर १,०७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत संपून २५ दिवस उलटले, तरी शासनाने खरेदी सुरू झाली नाही. योग्य भाव मिळेल, नोंदणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल घरात साठवून ठेवला आहे. दरम्यानच्या काळात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी तथा शेती मशागत, बी- बियाणे खरेदीसाठी पैसे लागणार असल्याने, काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपला माल विक्री सुरू केला असून, व्यापारी या संधीचा फायदा घेत मका फक्त १,४०० रुपये क्विंटल तर ज्वारी निम्मे भावाने म्हणजे १,३०० रुपये क्विंटल भावाने खरेदी करत आहेत.

शासनाची भरड धान्य योजना फसवी असून, शेतकऱ्यांना निम्मे भावात ज्वारी विकावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

- स्मिता वाघ, माजी आमदार, भाजप

रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी यंत्रणा तयार आहे. गोदाम उपलब्ध असून, २० हजार क्विंटल धान्य खरेदी करण्याची क्षमता असून, ज्वारी मका नोंदणी झाली आहे. गहूची नोंदणी झाली नाही. वरिष्ठांचे आदेश येताच खरेदी सुरू होईल.

- संजय पाटील, व्यवस्थापक शेतकी संघ, अमळनेर

ज्वारी मका इत्यादी रब्बी पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासंदर्भात शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा सर्व माल शेतकऱ्याकडे पडून आहे. पावसाळा जवळ आल्याने त्यात अळ्या, किडे पडून खराब होईल, तसेच खरीप हंगामात शेतकरी वर्गाला आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने खरेदी सुरू करून, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- धनंजय एकनाथ पाटील, शेतकरी, दहिवद, ता.अमळनेर.