शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार टिकेल : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 04:24 IST

शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार करणार नाही. आणि केला तरीही सरकार टिकेल, असा विश्वास

जळगाव - शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार करणार नाही. आणि केला तरीही सरकार टिकेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवार दि.९ रोजी दुपारी नियोजन भवन येथे पाणी आरक्षण व टंचाई बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.बैठक आटोपल्यावर पत्रकारांनी पालकमंत्र्यांना गाठून राज्यातील सेना-भाजपातील मतभेदांमुळे सेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे पवार यांनीच उघड केले आहे, असे विचारले असता पालकमंत्री पाटील म्हणाले की, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही.

सत्तेतून बाहेर पडल्यास राज्य अस्थिर होईल, तसेच त्यांचा पक्षही अस्थिर होईल, याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. आणि शरद पवार यांची ठाकरे यांनी भेट घेतली यात विशेष काही नाही. पवार हे जगन्मित्र आहेत. आम्हाला देखील त्यांनी कर्जमाफीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. मी त्यासंदर्भात दोन वेळा त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीचा जर राजकीय अर्थ काढला तर काय करणार? आणि पवार -ठाकरे यांचे जुने संबंध आहेत. उलट ते इतक्या दिवसांनी का भेटले? आधी का भेटले नाहीत? असा प्रश्न मला पडला. त्यामुळे ते भेटले असतील, विचारपूस केली असेल. त्यातून राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. तरीही शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार टिकेल. यावर ‘कसे काय टिकेल?’ असे विचारले असता ‘तुम्ही आहात ना सोबत’ असे सांगत त्यांनी प्रश्न टोलविला.

डीपीडीच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणारसकाळी सर्व आमदार, खासदारांची बैठक झाली. त्यात काय चर्चा झाली? अशी विचारणा केली असता पालकमंत्री म्हणाले की, खासदार, आमदारांना नियम समजावून सांगण्याचे काम मी यशस्वीपणे केले. डीपीडीसच्या निधीतून १३ कोटी ५० लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग होणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जुनाच आहे. मात्र त्यास वेळोवेळी स्थगिती मिळत गेल्याने हा १३.५ कोटींचा निधी आमदारांना देता येणे शक्य झाले होते. मात्र यंदा या शासन निर्णयाला स्थगिती न दिल्याने हा १३.५ कोटीचा निधी जि.प.कडे वर्ग करावा लागणार आहे. त्याबाबत चर्चा झाली. अखेर १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सर्व आमदार खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या शासन निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना