शहरं
Join us  
Trending Stories
1
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
2
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
3
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
4
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
5
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
6
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
7
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
8
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
9
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
10
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
11
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
12
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
13
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
14
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
15
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
16
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
17
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
18
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
19
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
20
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी - जसपालसिंग बग्गा यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:05 IST

‘टोलमुक्त भारत’ची घोषणा विरली हवेतच

ठळक मुद्देराज्य सरकारकडूनही अपेक्षाभंगआगामी निवडणुकीत विरोध पत्करावा लागेल

जळगाव : वाहतूकदारांचा टोल माफीचा प्रश्न असो की या क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रश्न अथवा इतर सर्वच समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरत असून आहे. हे सरकारवाहतूकदारांना केवळ खेळवित असल्याचा आरोप जळगाव जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा यांनी केला. चार वर्षांपूर्वी सरकारने केलेली ‘टोलमुक्त भारत’ची घोषणाही हवेत विरल्याचा दावा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरात वाहतूकदारांनी संप पुकारला असून त्यामुळे मालाच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. असे असले तरी त्यावर तोडगा निघत नसल्याने जीवनावश्यक वस्तूंचीही वाहतूक रोखण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने वाहतूकदारांच्या प्रश्नांवर पप्पू बग्गा यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी त्यांच्याशी झालेला हा संवाद....प्रश्न - सरकारकडे आपली कोणती मागणी प्रलंबित आहे ?उत्तर - वाहतूकदारांना देशभरात टोल कर माफ करण्याची मागणी केलेली आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने २०१५मध्ये वाहतूकदारांनी संप पुकारला होता. त्या वेळी सरकारने ‘टोलमुक्त भारत’ची घोषणा केली होती. मात्र इतके वर्ष झाले तरी त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. हे सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नाही.प्रश्न - वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडून कसा प्रतिसाद मिळत आहे?उत्तर - सरकार केवळ आम्हाला खेळवत आहे. वाहतूकदार हा देशातील कानाकोपऱ्यात प्रत्येक गावात जावून सेवा देत असतो. या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याची मागणी आम्ही २०१३मध्ये केली होती. त्या वेळी नकार मिळाला. आताही सरकार आम्हाला आश्वासनाच्या पलीकडे काही देत नाही. एकूणच कोणत्याही समस्या सोडविण्यास प्रतिसाद मिळत नाही.प्रश्न - इंधन दरवाढीच्या तुलनेत वाढीव भाडे मिळते का?उत्तर - इंधन दरवाढीत वारंवार होणारी वाढ डोकेदुखी ठरते. त्यामुळे अशी किरकोळ दरवाढ न करता सरकारकडे आम्ही एक महिना अथवा दोन महिन्यात एक रुपया अथवा दोन रुपये अशी वाढ करण्याची मागणी केली आहे. कारण वारंवार होणाºया किरकोळ दरवाढीच्या तुलनेत आम्हाला वाढीव भाडे मिळत नाही. यात काही जणांशी करार झालेले असतात, ते अशी भाडेवाढ देण्यास नकार देतात. सरकारने इंधन दरवाढीबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.प्रश्न - ई-वे बिलामुळे वाहतुकीतील अडथळे दूर झाले का?उत्तर - वस्तू व सेवा करात (जीएसटी) माल वाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली अंमलात आणली असली तरी ई-वे बिलाच्या क्रमांक नोंदणीसाठी पुरेसे साधने नसल्याने वाहतूकदारांना अडचणी येतात. त्यामुळे माल वाहतुकीच्या समस्या कायम आहे.राज्य सरकारकडूनही अपेक्षाभंगराज्य सरकारनेदेखील राज्यातील मोठे टोल माफ केलेच नाही. लहान टोल बंद केले असले तरी वाहतूकदारांची खरी समस्या मोठ्या टोलवर असते. एकदा मोठे वाहन निघाले तर त्याला एकेका टोलवर ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतात. माल वाहतुकीच्या मार्गावर किमान १० टोल लागतात. त्यामुळे एका बाजूने चार हजार रुपये व परतीच्या प्रवासात चार हजार असे केवळ दहा टोल लागले तरी आठ हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे राज्य सरकारकडूनही अपेक्षाभंग होत असल्याचे जसपालसिंग बग्गा यांनी सांगितले.आगामी निवडणुकीत विरोध पत्करावा लागेलवाहतूकदारांच्या या समस्यांसह विम्याचाही प्रश्न मार्गी लागत नसल्याने वाहतूकदारांचे सर्वच प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे सरकारला २०१९मध्ये या सर्वांचा विरोध पत्करावा लागणार असल्याचा इशारा पप्पू बग्गा यांनी दिला.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव