शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

आला उन्हाळा, आरोग्य संभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:36 IST

तज्ज्ञांचा सल्ला आजार बळावण्याची शक्यता, लहान मुलांची घ्या काळजी

ठळक मुद्देशरीरातील पाणी कमीमुळे थकवाजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षविविध आजार काढतात डोके वर

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.९ : अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ््याचे आगमन झाले असून उन्हाचा पाराही वाढू लागला आहे. या वाढत्या उन्हासोबत विविध आजारही वाढतात, त्यामुळे ‘आरोग्य सांभाळा...’ असाच सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.शरीरातील पाणी कमीमुळे थकवाउन्हामुळे शरीराचे तापमान वाढण्यासह शरीरातील पाणीदेखील कमी होते. त्यामुळे थोडे जरी कष्टाचे काम केले तर थकवा येतो. इतकेच नव्हे चक्कर येऊन प्रकृतीही खालावते. यासाठी शरीराचे पाणी कायम ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे व शक्यतो अवजड कामे करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.विविध आजार काढतात डोके वरउन्हाळ््यामध्ये जुलाब, उलट्या, कावीळ, विषमज्वर (टायफाईड), डायरिया असे आजार होण्यासह सर्वात मोठा धोका उष्माघाताचा असतो. या आजारापासून दूर राहण्यासाठी स्वत:च दक्षता घेणे महत्त्वाचे असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उन्हाळ््यामध्ये लग्न समारंभदेखील जास्त असतात. अशा ठिकाणी शक्यतो लहान मुलांना घेऊन जावू नये तसेच कोणत्याही समारंभात पाण्याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे.मुलांची घ्या काळजीउन्हाळ््यामध्ये डोळे येण्याचे प्रमाण वाढून डोळ््यांची साथ पसरते. या सोबतच गोवर, गालफुगी, कांजण्या असे आजार लहान मुलांना होत असतात. हे सर्व आजार संसर्गजन्य असल्याने अशा मुलांना शाळेत पाठवू नये, पाच चे सहा दिवस त्यांची घरीच विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देत मुलांना फळांचा जास्तीत जास्त रस द्यावा, असे आवाहनही डॉक्टरांच्यावतीने करण्यात आले आहे.हे टाळा

  • उघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच बाहेरचे खाणे-पिणे टाळावे
  • बर्फाचा गोळा ज्या पासून तयार होतो, त्या बर्फाच्या दर्जाची शाश्वती नसते, त्यामुळे बर्फाचे गोळे खावू नये.
  • सकाळी ११ ते सध्याकाळी सहा दरम्यान शक्यतो बाहेर पडू नये
  • जीन्स, घट्ट कपडे यांचा वापर टाळावा, आजारी मुलांना शाळेत पाठवू नये
  • आहारामध्ये उष्ण पदार्थांचा वापर टाळावा.

अशी घ्या काळजीशी घ्या काळजी

  • भरपूर पाणी प्या
  • फळ व त्यातल्या त्यात रसाळ फळे जास्त प्रमाणात खा
  • घर, कार्यालय व कामाच्या ठिकाणी कोठेही थंड वातावरण राहण्यासाठी कुलरचा वापर करा
  • बाहेर जाताना डोक्याला पांढरा रुमाल अवश्य बांधा
  • शक्यतो बाहेरची कामे सकाळीच करून घ्यावी
  • सुती व मोकळी कपड्यांचावापरकरा

जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षजळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा दरवर्षी ४६ ते ४७ अंशावर पोहचतो. त्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीनेदेखील दक्षता घेतली जाते. दरवर्षी यासाठी जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात येते. त्यानुसार यंदा तर फेब्रुवारी महिन्यातच या कक्षाची तयारी झाली असून यासाठी तीन खाटा (बेड) कुलर, एसीची व्यवस्था करण्यात आली आहे.

दक्षता म्हणून जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन खाटा, एसी, कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.- डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय.

टॅग्स :JalgaonजळगावHealth Tipsहेल्थ टिप्स