शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

काय झाले विचारले अन् झाला सू-याने वार; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

By सागर दुबे | Updated: April 9, 2023 15:03 IST

मध्यरात्री जाळली दुचाकी

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : उस्मानिया मशिदीजवळील गल्लीमध्ये तरूणांमध्ये वाद सुरू होता. त्यातील एकाला काय झाले, अशी विचारणा केल्यानंतर त्याचा त्याला राग येऊन आसिफ खान यासीर खान (२५, रा. पोलिस कॉलनी, सुप्रिम कॉलनी) या तरूणाच्या हातावर कोंबडी कापण्याच्या सु-याने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. एवढेच नव्हे तर त्या तरूणाने मध्यरात्री खान यांची घरासमोर उभी असलेली दुचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकली. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

पोलिस कॉलनी येथील आसिफ खान हे शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उस्मानिया मशिदीमध्ये नमाज पठणासाठी जाते होते. मशिदीजवळील गल्लीत त्यांच्या ओळखीच्या काही तरूणांमध्ये वाद सुरू होता. त्यातील एकाला त्यांनी काय झाले अशी विचारणा केली. मात्र, त्या तरूणाने त्यांच्याशी वाद घालून कोंबडी कापण्याच्या सु-याने त्यांच्या हातावर वार केला. भांडण सोडविण्यासाठी खान यांचे भाऊ व वडील आल्यावर त्यांना सुध्दा दोन जणांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आजू-बाजूच्या लोकांनी भांडण सोडवून खान यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. रात्रीच ते उपचार घेऊन घरी परतले.मध्यरात्री दुचाकी जाळून पळाला...

दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री २.१० वाजेच्या सुमारास आसिफ खान यांच्या भावाला अचानक जाग आली. त्याला घराबाहेर त्यांची एमएच.१९.डीएस.७९६९ क्रमांकाची दुचाकी ही जळताना दिसून आली. ही बाब त्याने कुटूंबियांना सांगितली. खान कुटूंबिय घराबाहेर आल्यानंतर त्यांनी आजू-बाजूच्या गल्लीत दुचाकी जाळणा-याचा शोध सुरू केला. तेव्हा आसिफ खान यांना मारणारा तरूण हा हातात प्लॅस्टिकची बॉटल घेऊन पळताना दिसून आला. अखेर शनिवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी