शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संताप अनावर झाला अन् आईला केली मारहाण; उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

By सागर दुबे | Updated: April 29, 2023 17:18 IST

मुलाविरूध्द गुन्हा.

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: एका घरामध्ये काही व्यक्तींसोबत आई दिसल्यानंतर संतापलेल्या मुलाने आईला लोखंडी सळईने हातासह कमरेवर आणि पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार, दि. २४ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता वडली गावामध्ये घडली होती. दरम्यान, जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही महिला वडली येथे दोन मुलांसह वास्तव्यास होती. सोमवारी रात्री १० वाजता महिलेची दोन्ही मुलं गावातील एका लग्नात नाचत होती. त्यावेळी त्यांना त्यांची आई एका घराकडे जाताना दिसून आली. ही बाब त्यांनी लागलीच शेजारीच राहत असलेल्या मामाला सांगितली. नंतर तिघेही त्या घराकडे गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला; पण आतून कुणीही दरवाजा उघडत नव्हता. अखेर मुलाने जोरात धक्का देऊन दरवाजा उघडला. तेव्हा त्यांची आई ही काही व्यक्तींसोबत दिसून आली. याचा राग येऊन मुलाने बाजूलाच ठेवलेली सळई उचलून आईला मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. त्यांना लागलीच रुग्णवाहिका बोलवून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.अन् प्राणज्योत मालवली...

महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे प्राणज्योत मालवली. अखेर महिलेच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून मयताच्या मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी