शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज : स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे ४०० दिवसआधी होणार निदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 05:55 IST

जळगावचे सुपुत्र डॉ. अजित गोयंका यांचे संशोधनपर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ मॉडेल ठरणार जगभरासाठी दिलासादायी

जळगाव : ‘सायलेंट किलर’ म्हणून दहशत माजविणाऱ्या कर्करोगाशी निगडित दिलासादायी ‘मॉडेल’ जळगावच्या सुपुत्राने अमेरिकेत विकसित केले आहे. डॉ. अजित गोयंका यांनी विकसित केलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) मॉडेलच्या माध्यमातून स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे ४०० दिवस आधीच निदान होणार आहे. डॉ. गोयंका यांचे संशोधनपर्व जगभरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 

जळगावात शिक्षण घेतलेले आणि ‘एम्स’च्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशात अव्वल ठरलेले डॉ. गोयंका  वैद्यकीय शिक्षण आटोपून ते संशोधनासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा अभ्यास सुरू केला. या आजाराचे लक्षणे, उपचार पद्धतीचे बारकाव्यांचे नीट निरीक्षण केले. आणि या गंभीर या आजाराविषयी ‘अलर्ट’ देणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी अभ्यास सुरू केला. त्यानुसार त्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ मॉडेल विकसित केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता’ मॉडेल

कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा वेळेवर शोध घेण्यासाठी कृतिक्षम बुद्धिमत्ता प्रदान करत आहे. हे मॉडेल सध्या स्वादुपिंडापुरते मर्यादित असले तरी, मधुमेहासारख्या इतर जुनाट आजारांसाठी ते विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहोत.

- डॉ. अजित गोयंका,

मेयो क्लिनिक व वरिष्ठ कर्करोग

विशेषज्ञ संशोधक, अमेरिका.

‘एआय’ देणार ‘अलर्ट’

डॉ. गोयंका यांच्या ‘मॉडेल’नुसार गंभीर लक्षणे समजण्यापूर्वीच १८ ते ३६ महिने आधी स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान होणार आहे. लक्षणे नसतानाही ४३८ दिवसांआधी स्वादुपिंडात गाठ झाली आहे का, याचीही सुस्पष्टता या ‘मॉडेल’च्या माध्यमातून होणार आहे. स्वादुपिंडाचा पोत नाजूकसा, तेवढाच टणकही असतो. त्यामुळे नाजूकतेपासून तर टणकतेपूर्वी असलेल्या घनतेविषयीदेखील या ‘मॉडेल’च्या माध्यमातून परिपूर्ण माहिती मिळणार आहे.

तीन हजार नमुन्यांची चाचपणी

डॉ. गोयंका यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ मॉडेलची तांत्रिकदृष्ट्या बांधणी करण्यापूर्वी तब्बल ३ हजार रुग्णांचे सिटी स्कॅन केले. त्यापैकी १,१०५ जणांचे स्वादुपिंडाचे होते. तर अन्य १,९०९ अन्य व्याधींचे होते. या निदानानंतरच डॉ. गोयंका यांनी ‘मॉडेल’ला विकसित केले आणि या मॉडेलच्या माध्यमातून निर्दोष निदानही होत गेले.