शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

आंबे उत्पादकांना यंदा ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 19, 2017 00:14 IST

आम्रमोहोर बहरला : थंडीमुळे पोषक वातावरण, सुगीचाही बहर, शेतकºयांच्या आशा पल्लवित

भडगाव : तालुक्यात  सध्या   रब्बी पिकांच्या हिरवळीने शेतशिवार नटला आहे.  त्यात आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहोर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे.तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. इतर पिकासोबतच आजोबा-पणजोबांनी शेताच्या बांध कोºयावर, जामदा उजवा-डावा कालव्यावर विविध आंब्याची रोपे लावली असून ती आज डेरेदार वृक्ष झाली आहेत.  या आंबे फळबहार खरेदी विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयाची आर्थिक उलाढाल केली जाते. आंबे हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळून उत्पन्नासाठी आधार बनले आहे. तालुक्यात गावरान जातीची आंब्याची झाडे  मोठ्या प्रमाणावर आहेत. यात सोप्या, दोडी, गोट्या,  सेंद्र्या, काळ्या, बाजºया, लंगड्या, ढवळ्या अशी आंब्याची नावे आहेत. थंडीमुळे आंब्यांने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहोर बहरल्याचे दिसत आहे.  यंदा जमिनीत जलपातळी चांगली असल्याने आम्रमोहोर बहरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. या झाडांचा सौदा केला जातो. आंबे खरेदी-विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. जामदा उजवा-डावा कालव्यावरील आंब्याच्या झाडांचाही व्यापाºयांना लिलाव दिला जातो.  शेतकºयांना आंबे उत्पन्नातून संसाराचा गाडा चालविण्यास मोठा आधखार मिळत आहे.  शेतकरी तुरळकच आंबे लागवड करतात. शासन तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंब, चिंच, सिसम लागवड करते. तालुक्यात आंबे लागवडीचे प्रमाण अधिक वाढवावे. कारण यामुळे शेतकºयांना उत्पन्न वाढीसाठी लाभ होऊ शकतो.तालुक्यातील बात्सर येथे गावकºयांनी हजारो आंब्याची झाडे लावून ती जतन ेकेली आहेत. त्यामुळे गावाला हे उत्पन्नाचे साधन बनणार आहे. बात्सर गावाचा आदर्श घेऊन शासनाने गावोगावी आंब्याची रोपे अधिक प्रमाणात लावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पाटबंधारे विभागानेही जामदा उजवा-डाव्या कालव्यालगत आंबे लागवडीचे नियोजन करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.पूर्वी लावलेली डेरेदार आंब्याची झाडे, आमराया  नजरेस पडत आहेत. मात्र  शेतकरीच  हिरव्या डेरेदार वृक्षांवर घाव घालून या झाडांची कत्तल करीत आहे. अवैधरीत्या या झाडांची तोड केली जात असतानाचे दृष्य नजरेला पडत आहे. या आंब्याच्या झाडांची कत्तल थांबवणे गरजेचे आहे तर आमराया लवकरच नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.  वादळवाºयानेही आंब्याची झाडे, फांद्या तुटून मोठे नुकसान होते. हे नुकसान रोखणे आवश्यक आहे.