शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

सोने ३७ हजार २०० तर चांदी ४२ हजार ५०० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 12:56 IST

सोन्यात तेजी सुरूच, चांदीही एक हजाराने वधारली

जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असल्याने सोन्यामध्येही तेजी सुरूच आहे. सोन्याच्या भावात पुन्हा ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ३७ हजार २०० रुपये प्रती तोळा झाले आहे. सोन्यासोबत चांदीही एकाच दिवसात एक हजार रुपये प्रती किलोने वधारून ती ४२ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी यामुळे सोन्याचे भाव दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ६ रोजी ३६ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात बुधवारी ७०० रुपयांनी वाढ झाली. सोने आज ३७ हजार २०० रुपयांवर पोहचले आहे.६ रोजी केवळ सोन्याच्या भावात वाढ झाली होती. मात्र ७ आॅगस्ट रोजी चांदीच्या भावात एक हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. या पूर्वी २३ जुलै रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन चांदी ४० हजार रुपये प्रती किलोवरून ४१ हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंर दोन आठवड्यात पुन्हा एक हजार रुपयांनी चांदी वधारली आहे.सोने गाठणार ४० हजाराचा टप्पामुंबई शेअर बाजारातील घसरण पाहता सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. तसेच रुपयातील घसरणीमुळे सोने असेच वाढत राहणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. यामध्ये पुढील आठवडाभरातील डॉलरच्या तुलनेतील भारतीय रुपयाच्या दरांचा अंदाज पाहता रुपयात घसरण सुरूच राहणार असल्याचे सांगितले जात असल्याने सोने ४० हजारावर पोहचण्याची शक्यता असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची वाढलेली खरेदी व दुसरीकडे भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे. सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव