शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महिनाभरात सोन्याचे भाव दोन हजारांनी घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 06:18 IST

रुपया वधारल्याचा परिणाम : दर प्रति तोळा ३२ हजारांवर

जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्याने सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. महिनाभरात सोन्याचे भाव प्रती तोळा दोन हजार रुपयांनी कमी होऊन ते ३४ हजारांवरून ३२ हजारांवर आले आहेत. चांदीचे भाव ४१ हजार ५०० रुपयांवरून ते ३९ हजारांवर आले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने तसेच सोन्याच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक वाढत असल्याने हा परिणाम झाला असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. गेल्या महिन्यात ७२ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे दर ६९.०२ रुपयांवर आले. २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ते ३३ हजारांवर आले. ९ मार्च रोजी ३२ हजार ८०० रुपयांवर आले. तेव्हापासून दररोज भाव कमी होत आहेत. तीन दिवस सोने ३२ हजारांवर कायम राहिले व २ एप्रिलला ३०० रुपयांनी वाढ होऊन ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले.लग्नसराई असल्याने मागणी वाढलीअमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्यामुळे सोन्याचे भाव कमी होत आहे. सध्या लग्नसराईमुळे सोने-चांदीची मागणी वाढली असून खरेदीवर परिणाम नाही.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ असोसिएशन, जळगाव.चांदीतही घसरण : सोन्यासोबतच चांदीचेही भाव कमी होत आहे. महिनाभरात हे भाव थेट अडीच हजार रुपये प्रती किलोने कमी झाले आहेत. २४ मार्चला ३९ हजार ५०० रुपये प्रती किलो व २९ मार्चला ३९ हजारांवर चांदी आली. तेव्हापासून २ एप्रिलपर्यंत हे भाव ३९ हजारांवर स्थिर आहेत.

टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय