जळगाव : अमेरिका व इराणमधील तणावामुळे दोन दिवसांपासून मोठी भाव वाढ झालेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी ५५० रुपये प्रती तोळ््याने घसरण झाली. त्यामुळे सोमवारी ४१ हजार ४०० रुपयांवर असलेल्या सोन्याचे भाव मंगळवारी ४० हजार ८५० रुपये प्रती तोळ््यावर आले.अमेरिका व इराण यांच्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर मोठा परिणाम होऊन ४ रोजी सोन्याच्या भावात एक हजार रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ४० हजार ६०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर सोमवारी पुन्हा त्यात ८०० रुपयांची वाढ होऊन ते ४१ हजार ४०० रुपयांवर गेले. मात्र अति उच्चांकीवर हे भाव पोहचल्याने मंगळवारी त्यात घसरण झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
दोन दिवसांच्या उसळीनंतर सोन्यात ५५० रुपयांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:57 IST