शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात सोने ८०० रुपयांनी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 12:20 IST

चांदीही हजार रुपयांनी घसरली

ठळक मुद्देग्राहकांना दिलासासोने ३२ हजाराच्या खाली

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव घसरल्याने त्याचा परिणाम भारतातही झाला असून आठवडाभरात सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ््याने घसरले आहेत. चांदीच्याही भाव एकाच दिवसात एक हजार रुपये प्रती किलोने घसरण झाली आहे. ऐन खरेदीच्या हंगामात भाव कमी झाल्याने त्याचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरल्याने भारतात ऐन खरेदीच्या हंगामात सोन्याचे भाव गडगडले आहे.सोने ३२ हजाराच्या खालीगेल्या महिन्यात सोने ३२ हजारावर पोहचले होते. दिवाळीच्या काळात धनत्रयोदशीच्या मुहूर्तापासून सोने ३२ हजार ४०० रुपयांवर होते. मात्र अमेरिकेत सोन्याचे भाव कमी होताच ९ नोव्हेंबर, भाऊबीजेपासून कमी होत गेले. १० नोव्हेंबर रोजी सोने ३१ हजार ९०० रुपये प्रती तोळ््यावर येऊन सोने पुन्हा ३२ हजाराच्या खाली आले. तेव्हापासून घसरण सुरूच असून १२ नोव्हेंबरनंतर २०० रुपयांनी पुन्हा सोन्याचे भाव कमी होऊन ते १३ रोजी ३१ हजार ७०० रुपये प्रती तोळा झाले. पुन्हा १०० रुपयांनी घसरण होऊन १४ रोजी ३१ हजार ६०० रुपयांवर सोने आले. १५ रोजीदेखील ते ३१ हजार ६०० रुपयांवर स्थिर राहिले. एकूणच आठवडाभरात सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ््यांनी कमी झाल्याचे सुवर्ण बाजारात चित्र आहे.चांदीत एक हजार रुपयांनी घसरणचांदीच्याही भावात अशाच प्रकारे घसरण सुरू असून दिवाळीपासून ४० हजार रुपये प्रती किलोवर असलेल्या चांदीच्या भावात १४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात तब्बल एक हजार रुपये प्रती किलोने घसरण झाली, ती ३९ हजार रुपयांवर आली. गेल्या तीन दिवसांपासून चांदी ३९ हजार रुपये प्रती किलोवर स्थिर आहे.दोन-चार दिवसात पुन्हा तेजीची शक्यताआता सोने-चांदीचे भाव कमी झाले असले तरी मागणीचा विचार करता आंतरराष्ट्रीय पातळीसह भारतातही सोने-चांदीचे भाव पुन्हा पूर्ववत येण्याचे अर्थात पुन्हा भाववाढीचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांनी दिले आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांना सोने-चांंदी खरेदीची पर्वणी मानली जात आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने भारतातही त्यांचे दर कमी झाले आहे. मात्र दोन ते चार दिवसात हे भाव पुन्हा पूर्ववत होतील.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव