शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

उच्चशिक्षित व सधन कुटुंबातील तरुणीने लांबविली सोनसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:16 IST

फुले मार्केटमधील घटना : अंगावर केमिकल टाकले, बोदवडची युवती अटकेत

जळगाव : फुले मार्केटमध्ये खरेदी करीत असलेल्या पूजा ओमप्रकाश व्यास (रा.बालाजी पेठ) या वकील तरुणीच्या पाठीवर व मानेवर केमिकल टाकून गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबविणाऱ्या हर्षदा किशोर महाजन (रा.बोदवड) या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला लोकांनी पाठलाग करुन पकडल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली. हर्षदा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात बीबीएमच्या दुसºया वर्षाला शिक्षण घेत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीपेठ येथे वास्तव्यास असलेल्या अ‍ॅड पूजा ओमप्रकाश व्यास या रविवारी दुपारी १ वाजता बहिण आरती सोबत फुले मार्केट येथे खरेदीसाठी आल्या होत्या. दोन्ही बहिणी खरेदी करुन एका ड्रायफूट दुकानासमोरुन पायी चालत असताना तोंडाला स्कार्प बांधलेल्या एका तरुणीने पूजा व आरती या दोघांच्या मानेवर केमिकल टाकले. यानंतर मानेवर आग व्हायला लागल्याने पूजा मागे वळून पाहत नाही तोच केमीकल टाकणाºया तरुणीने पूजा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली व तेथून पळ काढला.वडील बागायतदार शेतकरी, काका पंचायत समिती सदस्यसंशयित तरुणीला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी तिची चौकशी केली असता या तरुणीचे वडील बागायतदार शेतकरी असून ८० एकर शेती आहे, तसेच काका पंचायत समितीचे सदस्य आहेत.उच्च घराण्यातील ही तरुणी असून दोन दिवसापूर्वीच आईने तिला साडे पाच हजार रुपये दिले होते, तरीही तिने चोरीचा प्रकार केला, त्यामागे काय कारण असू शकते याचा पोलीस तपास करीत आहेत.दिशाभूल करण्याचा प्रयत्नसोन्याची साखळी माझीच आहे, धक्का लागला म्हणून वाद झाला, मी चोर नाही, असे म्हणत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मला सोडा, माझ्या घरी सांगू नका, अशा विनवण्यात ती करीत होती.पोलिसांनी दम भरल्यावर तिने खरी माहिती दिली.कवयित्री बहिणीबाई विद्यापीठात बीबीएमच्या दुसºया वर्षाला शिक्षण घेत आहे व तेथेच वसतीगृहात राहत असल्याचे तिने सांगितले.दरम्यान, या तरुणीला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी तीची आरोग्य तपासणी करण्यात आली.चोर...चोर...ऐकताच पोलिसही धावलेगळ्यातील साखळी तोडल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पूजा यांनी चोर...चोर...पकडा...पकडा अशी आरडाओरड करत सोनसाखळी लांबविणाºया तरुणीचा पाठलाग केला. हाके च्या अंतरावर असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे सुनील पाटील, भरत ठाकरे, सुधीर सावळे, प्रणेश ठाकूर, रवींद्र साबळे, नवजीत चौधरी यांनी घटनास्थळाकडे धाव घेत तरुणीला पाठलाग करुन ताब्यात घेतले. तिच्या हातात पूजा यांची साडे पाच ग्रॅमची २० हजार रुपये किमतीची लांबविलेली पोत मिळून आल्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर तक्रार देण्यासाठी पूजा बहिणीसह शहर पोलीस ठाण्यात आली.वकील तरुणीवर ठेवली पाळत; कारण अस्पष्टपूजा यांची बहिणी आरती हिने सांगितल्यानुसार संशयित हर्षदा ही दोन ते तीन दुकानांवर खरेदी असतांना लक्ष ठेवून होती. दोन्ही बहिणींच्या गळ्यात सोनसाखळी होती. संधी मिळताच तिने दोघांच्या अंगावर केमिकल्स टाकले आणि गळ्यातील साखळी तोडून पळ काढला. पूजासह बहिणी आरती हिला केमिकल टाकलेल्या ठिकाणी प्रचंड आग होत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पूजा व्यास यांच्या फिर्यादीवरुन हर्षदा हिच्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी तिच्या वसतीगृहात जावून तिच्या खोलीचीही झडती घेतली. महागडे कपडे, बुट असा तिचा वावर असून तिने चोरी का केली याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव