शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

भाजपच्या मुसंडीनंतर सोने-चांदीत घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:54 IST

शेअर मार्केटमध्ये गंगाजळीने रुपयांत सुधारणा

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र दिसू लागताच शेअर मार्केटने उसळी घेतल्याने व भारतीय रुपयाही वधारल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. निवडणुकीचे निकाल येऊ लागताच सोने प्रती तोळा १०० रुपये तर चांदी ५०० रुपये प्रती किलोने घसरून सोने ३२ हजार २०० रुपये प्रती तोळा तर चांदी ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली आहे. विशेष म्हणजे निकालाविषयी एक्झिट पोलच्या अंदाजानंतर घसरण झाली व त्या पाठोपाठ निकालानंतरही घसरण कायम राहिली.आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने-चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यात आता देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचाही यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. २३ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागताच विदेशी गुंतवणुकीचा कल मुंबई शेअर बाजाराकडे वळला व विदेशी गंगाजळी वाढल्याने शेअर बाजाराने उसळी घेतली. यामुळे विदेशात सोने-चांदीचे भाव कमी झाले. या सोबतच भारतीय रुपयातही सुधारणा होऊन हे भाव कमी होण्यास मदत मिळाली. लोकसभेचे निकाल जाहीर होण्याच्या दिवशी २३ रोजी सकाळी ६९.६४ रुपये असलेले अमेरिकन डॉलरचे भाव २४ रोजी ६९.५२ रुपयांवर तर २५ रोजी ते ६९.३८ रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोन्याचे भाव कमी होऊन ३२ हजार ३०० रुपयांवरून ३२ हजार २०० रुपयांवर आले. या सोबतच चांदीतही एकाच दिवसात ५०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली.नऊ दिवसात ७०० रुपयांनी घसरणनऊ दिवसांपूर्वी १५ मे रोजी भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने सोन्याचे भाव वाढत जाऊन ते ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले होते. ३३ हजाराच्या उंबरठ्यावर सोने असताना ऐन लग्नसराईत एक्झिट पोलच्या अंदाजाने सोने पुन्हा गडगडले व त्या वेळी सोन्याचे भाव ३२ हजार ३०० रुपयांवर आले होते. आता निकालानंतर पुन्हा घसरण होऊन हे भाव ३२ हजार २०० रुपयांवर आले आहे. शनिवारीदेखील हेच भाव कायम होते.विदेशी गंगाजळीचा परिणामभारतीय शेअर बाजारात विदेशी गंगाजळी वाढल्याने विदेशात सोन्याचे भाव घसरले व दुसरीकडे भारतीय रुपया सुधारत या दुहेरी परिणामामुळे सोने घसरल्याचे जाणकारांनी सांगितले.शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढण्यासह भारतीय रुपयात सुधारणा झाल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव