शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात विद्यार्थ्यांनी बनवली ‘गोकार्ट’ रेसिंग कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 17:29 IST

पुणे येथील राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत यशस्वी सहभाग

ठळक मुद्देकार बनविण्यासाठी दुचाकीचे १२५ सीसी इंजिन व ब्रेक पद्धती वापरली एक समान रस्त्यावर चालणारी ही कार आहे.११० किलोग्रॅम वजनाची व एक तासाच ८० किमीचे अंतर पार करणारी अनोखी रेसिंग कार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि - ३ येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकेनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ११० किलोग्रॅम वजनाची व एक तासाच ८० किमीचे अंतर पार करणारी अनोखी रेसिंग कार तयार केली आहे.पुणे येथील शासकीय आर.टी.ओ ट्रॅक येथे झालेल्या राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी ४५ संघांमध्ये त्यांना गोकर्ट कडून ठरलेल्या सर्व चाचण्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.एक समान रस्त्यावर चालणारी ही कार आहे. अचानक ब्रेक लावून थांबविणे, पुढच्या सेकंदाला पुन्हा वेगाने स्पर्धा करणे असे वेगळे अनुभव देणारी ही कार आहे. आॅटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप यांच्या तर्फे आयोजित पुणे येथे चित्तथरारक रेसिंग स्पर्धा पार पडली. यावेळी ५ किमी अंतराचा थरारक ट्रॅक तयार करण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी आॅगस्ट २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान महाविद्यालयातील वर्कशॉपमध्ये ही कार तयार केली आहे. कार बनविण्यासाठी दुचाकीचे १२५ सीसी इंजिन व ब्रेक पद्धती वापरली आहे. स्पर्धांमध्ये विना अपघात निर्धारित वेळेत होणाऱ्या ब्रेक टेस्टिंग, ड्रग रेसिंग, नाईट रेसिंग, आॅटो क्रॉस रेसिंग व स्किड पेड रेसिंग या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून सहभाग नोंदविला.या विद्यार्थ्यांनी तयार केली कारड्रायव्हर विवेक वाणी, प्रतिक भावसार, स्टेअरिंग हेड ललित बाविस्कर, हेमंत चौधरी, अक्षय जैस्वाल, महेंद्र चौधरी, ट्रान्समिशन - जयंत बोरसे, निखील चौधरी, वैभव पाटील, वैभव डीमरी, ब्रेक - हितेश क्षीरसागर, अमोल ताडे, अक्षय अमृतकर, सचिन कोल्हे, ललितकुमार माळी, डिझाईन- सोपान कडू, यश फुले( कॅप्तन), सहाय्यक - यश भावसार, दीपक भदाणे, दुर्गेश चौधरी, जयेश नेहेते, गणेश राठोड, प्रशांत पाटील, शाम शिंदे, शुभम बोरसे या विद्यार्थ्यांनी ही गोकार्ट रेसिंग कार तयार केली आहे. मार्गदर्शक म्हणून प्रा. तेजस भिरूड, प्रा.दत्तात्रय चोपडे होते.

टॅग्स :Jalgaonजळगावcollegeमहाविद्यालय