शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंश झालेल्या दोघांना मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 19:19 IST

विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती गंभीर होऊन बेशुद्धावस्थेत दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देजळगाव जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचारदोन दिवस दिली मृत्यूशी झूंजजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केले तत्काळ उपचार

जळगाव : विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती गंभीर होऊन बेशुद्धावस्थेत दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.चोपडा तालुक्यातील गौºयापाडा येथील उन्मेष जगदीश बारेला (११) हा मुलगा मंगळवार, २४ रोजी सकाळी शौचास गेला असता त्याठिकाणी त्याला सापाने दंश केला. त्या वेळी या मुलाने घरी येऊन सर्पदंश झाल्याचे सांगितले. दंश करणारा साप विषारी असल्याने या मुलाची प्रकृती खालावत चालल्याने त्याला बेशुद्धावस्थेत चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याला जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बेशुद्धावस्थेत आलेल्या उन्मेषची दोन दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती.दुसºया एका घटनेत पाचोरा येथील कमल रमेश डोंगरे (४५) या महिलेला सोमवार, २३ रोजी रात्रीच्या वेळी घरी झोपेतच सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालयात हलिवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांनाही जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनादेखील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या ठिकाणी दोघांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार व त्यांच्या सहकाºयांनी शर्थीचे प्रयत्न करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

टॅग्स :Jalgaonजळगावhospitalहॉस्पिटल