शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात मराठा समाजाच्या मंगल कार्यालयासाठी दिली २२ हजार स्केअर फूट जागा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 17:23 IST

संगमनेर येथील व्यावसायिकाचे दातृत्त्व

ठळक मुद्देचाळीसगाव येथे समाजाच्या बैठकीत दिली जागा भेटसमाजबांधवांतर्फे दिनकर पाटील यांचा सत्कारकरगाव शिवारात होणार मराठा समाजाचे मंगल कार्यालय

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव,दि.११ : समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून मुळचे संगमनेर येथील तर कर्मभूमी चाळीसगाव असलेले दिनकर कडलक (पाटील) यांनी २२ हजार स्केअर फुट म्हणजे तब्बल अर्धा एकर जागा मराठा समाज मंगल कार्यालयासाठी भेट दिली.चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड येथील आदित्य मंडप डेकोरेटर येथे मराठा समाज बांधवांची १० रोजी बैठक झाली. मराठा मंगल कार्यालयासाठी दिनकर कडलक पाटील यांनी करगाव शिवारातील अर्धा एकर शेतजमीन एक रुपया न घेता मंगल कार्यालयाला देवू केली आहे. त्यांच्या दातृत्वा मुळे त्यांचा मराठा समाज बांधवांतर्फे शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आलाप्रारंभी छत्रपती शिवराय व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समाधान बछाव यांनी चाळीसगाव येथे अनेक समाजाचे मंगल कार्यालय आहेत, मात्र मराठा समाजाचे मंगल कार्यालय नसल्याची खंत व्यक्त केली. दिनकर पाटील यांनी पुढाकार घेत जागा देण्याचे जाहीर केले. करगाव शिवारातील अर्धा एकर शेत जमीन म्हणजेच २२ हजार स्केअर फुट जागा मराठा मंगल कार्यालय करीता मोफत देण्यात आली आहे. मंगल कार्यालय उभारणीसाठी मदत करण्याचे आवाहन गणेश पवार यांनी केले. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की माझ्या आजीने शिर्डी साई संस्थानला जागा दिली होती. त्यांचा वारसा जोपासत व सामाजिक भान ठेवून समाजाचे मंगल कार्यालय व्हावे यासाठी जागा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दिनकर पाटील. गणेश पवार. खुशाल मराठे, रवि पाटील, राजेंद्र शिंदे, अरुण पाटील, योगेश पाटील, अजय पाटील, पी.एन.पाटील, जितेंद्र पवार, गणेश पाटील, अरुण शेवाळे, अरुण मांडे, छोटु अहिरे, भूषण पाटील, संजय कापसे, केशव पाटील, ईश्वर पवार, सचिन गायकवाड, संदीप जाधव, नाना पाटील, सचिन पवार, राजेश पाटील, समाधान बछाव, नीलेश साळुंखे, अशोक जगताप उपस्थित होते. आभार खुशाल पाटील यांनी मानले.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव